तुम्हालाही युरिक अ‍ॅसिडची समस्या आहे का? वेळीच सावध व्हा, जाणून घ्या उपचार

Banana Peel Remedies For Uric Acid: तुम्हाला युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल तर वेळीच सावध व्हा. कारण युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर उठताना बसताना शरीर सुद्धा साथ देणं थांबवू शकतं. अशावेळी या आजारावर कोणते उपचार करु शकतात ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 8, 2024, 03:23 PM IST
तुम्हालाही युरिक अ‍ॅसिडची समस्या आहे का? वेळीच सावध व्हा, जाणून घ्या उपचार title=

High Uric Acid Home Remedies In Marathi : जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडचे (Uric Acid) प्रमाण वाढते तेव्हा या आजारावर वेळीच उपचार करणं योग्य ठरेल. जर या अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले तर जागेवरुन उठणे-बसणे शक्य होणार नाही. युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्याने अनेक आजारांना सामोरे जावं लागत. शरीरातील युरिक अ‍ॅसिड मुख्यत्वे किडनीद्वारे फिल्टर होऊन लघवीमध्ये बाहेर पडतो. परंतु जेव्हा किडनीचे कार्य कमी होते अन् शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होतात. युरिक ॲसिड वाढले की ते कमी करणेही तुमच्या हातात आहे. तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवून तुम्ही या आजारावर मात करू शकता. आहारतज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचे सेवन केल्याने शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यातच अजून एक म्हणजे असं एक फळ आहे ज्याची साल खाल्ली तरी युरीक अ‍ॅसिडपासून सुटका होते. नेमकं ते फळ कोणतं आहे ते जाणून घेऊया... 

ज्यांना यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने समस्या उद्भवतात, अशा लोकांना सिट्रसयुक्त फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये विशेषतः संत्र, आवळा, लिंबू अशा फळांचा समावेश होतो. आम्लयुक्त फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ही फळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर केळीचं साल देखील या आजारावर खूप फायदेशीर ठरु शकतं. 

हे सुद्धा वाचा : सोने खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या आजचे दर 

जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिड किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्ही केळीच्या सालीपासून बनवलेला चहा पिण्यास सुरुवात करा. कारण केळ्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जरी कमी असलं तरी या मध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. यामधील एक अँटिऑक्सिडेंट जो रक्तातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. त्याची सालंही त्याच प्रकारे काम करतात. जर तुम्हाला या आजारापासून सुटका हवी असेल तर केळीचा चहा बनवण्यासाठी दोन केळीच्या साली आणि दोन कप पाणी घ्या. याचा तुम्हाला यूरिक अ‍ॅसिड किंवा सांधे दुखण्यापासून आराम मिळेल. 

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) नुसार तुम्ही या आजारावर किवी फळ ही फायदेशीर ठरेल. कारण किवीमध्ये पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. जे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते. जर तुम्हाला अपचनाच्या तक्रारी असतील तर किवीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

तसेच सफरचंद खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास खूप मदत होते. सफरचंद हे फायबर समृद्ध फळ आहे. सफरचंद खाल्ल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. युरिक अ‍ॅसिड फायबरद्वारे शोषले जाते आणि नंतर अतिरिक्त यूरिक ऍसिड विष्ठा आणि लघवीद्वारे शरीराबाहेर फेकले जाते.