दिवाळीमध्ये वाढतंय वजन, अशा प्रकारे करा नियंत्रित!

दिवाळीमध्ये फराळावर ताव मारण्याआधी या गोष्टी जरूर वाचा

Updated: Oct 8, 2022, 04:38 PM IST
दिवाळीमध्ये वाढतंय वजन, अशा प्रकारे करा नियंत्रित! title=

Weight Control Tips : दिवाळी जवळ येत आहे, दिवाळीसाठी घराघरांमध्ये फराळ तळला जातो. शंकरपाळ्या, करंजी, चकली, अनारसं अनेक पदार्थ केले जातात. चवीला एकापेक्षा एक चटपटीत असलेले पदार्थ जितके चवदार असतात मात्र त्याने तुमचं वजनही त्याप्रमाणात वाढतं. कारण पदार्थ साखरेत आणि तेलामध्ये केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे पदार्थ खाणं तर आपण टाळू शकत नाही पण ते खाल्लामुळे वजनही झपाट्याने वाढतं. जर तुम्हाला ते खावून तुमचं वजन नियंत्रित करायचं असेल तर खाली दिलेल्या गोष्टी नक्की वाचा. (how to control weight during festive season weight loss tips Health Marathi News)

भरपूर झोप घ्या
वजन वाढण्यामागे झोप हे एक प्रमुख कारण आहे. सण-उत्सवात मजा करताना अनेकदा झोप पूर्ण होत नाही. झोप नीट पूर्ण झाली नाही तर वजन वाढू लागतं. त्यामुळे दिवाळीतर साजरी कराच त्यासोबत पूर्ण झोपही घ्या.  कमीतकमी 7 तास झोपणं आवश्यक आहे. मिठई आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. 

खाण्यावर नियंत्रण
सणासुदीत गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. डिशेस बघून सगळ्यांच्याच मोह होतो. या दिवसात अशा गोष्टी कमी खाल्ल्या तर वजन नियंत्रित ठेवता येते. सकाळी स्प्राउट्स, सूप, ओट्स अशा आरोग्यदायी गोष्टी खाल्ल्या तर शरीरात भरपूर ऊर्जा येते आणि पोट भरल्यामुळे मनाला पदार्थांचा मोह पडणार नाही.

व्यायाम करा
आपण अनेकदा घरातील कामात व्यस्त असतो. यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. सण-उत्सवात वाढलेले वजन थांबवायचे असेल तर रोज व्यायाम करा. व्यायामामुळे अतिरिक्त कॅलरीजही बर्न होतात. दररोज 15 मिनिटे व्यायाम किंवा योगासने केली तर त्याचा फायदा होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)