गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वायू प्रदूषण धोकादायक !!

बाळावर असा होतो परिणाम 

गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वायू प्रदूषण धोकादायक !!  title=

मुंबई : वायू प्रदूषणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, लहान मुलांच्या स्वास्थात उच्च रक्तचापाचा फटका अधिक जाणवत आहे. ज्या गर्भवती महिलांना गर्भ काळात सहाव्या ते नवव्या महिन्यात वायू प्रदूषणातील उच्च स्तराचा सामना करावा लागणार आहे. पीएम 2.5 असा वायू प्रदूषणातील एक प्रकार आहे. जो प्रकार मोटर वाहन, तेल, कोळसा यांच्या जळण्यातून निर्माण होतो. याचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. 

अमेरिकेत जॉन हॉपकिन्स विद्यालयातील सहाय्यक प्रोफेसर नोल टी म्यूलर यांनी सांगितले की, हे असं पहिलं अध्ययन आहे ज्यामध्ये गर्भावस्थेत होणारा परिणाम सांगितला गेला आहे. गर्भवती महिलेला या काळात वायू प्रदूषणाचा मोठा फटका बसतो. या वायू प्रदूषणात महिलेने घेतलेल्या श्वासाचा फटका गर्भातील बाळावर होतो. 

हायपरटेंशन जर्नलमध्ये प्रकाशित केल्या प्रमाणे, बाल्यावस्थामध्ये उच्च रक्तचापचा फटका बाळाला बसतो. रक्तचापचा फटका हृदयाशी जोडलेल्या आजारांशी होतो.