हास्याबद्दल या ५ आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे. 

Updated: Mar 17, 2018, 02:26 PM IST
हास्याबद्दल या ५ आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? title=

मुंबई : जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे. प्रत्येकाच्या हास्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. काही माणसे तर त्यांच्या हास्यासाठी ओळखली जातात. मग दात असो किंवा ओठांची ठेवण यामुळे प्रत्येकाचे स्माईल काही खास आहे. याव्यतिरिक्त हास्याबद्दल तुम्हाला अजून काय माहित आहे ? मग जाणून घ्या हास्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी.

हसल्याने endorphins ची निर्मिती होते: 

जेव्हा तुम्ही हसता, अगदी जबरदस्तीने हसलात तरी शरीरात endorphins या फील गुड हार्मोनची निर्मिती होते. त्यामुळे मूड चांगला होतो.

हसल्यामुळे रक्तदाब कमी होतो:  

हसल्यामुळे endorphins च्या पातळीत वाढ होते आणि रक्तदाब कमी होतो. म्हणजे हसणे निरोगी आयुष्यासाठी फायदेशीर आहे.

१९ प्रकारच्या स्माईल्स आहेत: 

स्मितहास्यापासून खूप आनंदी हसण्यापर्यंत एकूण १९ प्रकारच्या स्माईल्स आहेत.

हसल्याने चेहऱ्याला उत्तम व्यायाम मिळतो: 

जर तुम्हाला थोडीफार डबल चीन जाणवत असेल तर फक्त हसा. हसण्याने २६ स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे जबडा, चेहऱ्याचे स्नायू यांना चांगला व्यायाम मिळतो.

स्माईल सप्लिमेंट्स तोंडाचे आरोग्य सुधारते:

फक्त त्वचा आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी नव्हे तर चांगल्या हास्यासाठी देखील काहीजण स्माईल सप्लिमेंट्स घेतात. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट असल्याने इम्म्युनिटी सुधारते आणि तोंडाचे संपूर्ण आरोग्य उत्तम राहते.