International Men's Day : पुरुषांनो, असा ठेवा तुमचा हेल्दी डाएट

१९ नोव्हेंबर दिवस जागतिक पुरुष दिवस...

Updated: Nov 19, 2019, 09:58 AM IST
International Men's Day : पुरुषांनो, असा ठेवा तुमचा हेल्दी डाएट title=
संग्रहित फोटो

मुंबई : जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. पुरुष आणि महिलांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा वेग-वेगळ्या असतात. दोघांनाही वेगळ्या डाएटची गरज असते. पुरुषांच्या शरीरात अधिक प्रथिनांची (प्रोटीन) गरज असते. त्याशिवाय व्हिटॅमिन, मिनरल्सचीही गरज असते. निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी पुरुषांना आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे.

बदाम - प्रोटीनयुक्त बदाम पुरुषांचे टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढण्यास मदत करतात. त्याशिवाय बदाममध्ये असलेले प्रोटीन, मँगनीज, झिंक यांसारखे तत्व एनर्जी देतात. पुरुषांना दररोज ५ ते ६ बदाम खाणं गुणकारी ठरतं.

टोमॅटो - पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरयुक्त टोमॅटो हृदय सुरळित ठेवण्यास मदत करते. टोमॅटोमुळे पुरुषांमधील प्रॉस्टेट कॅन्सरचा खतराही कमी होण्याची शक्यता असते.

कोबी - व्हिटॅमिन के आणि कोलेस्ट्रॉल फ्री असलेल्या कोबीचा रोत्री जेवणात सॅलेड म्हणून समावेश करणं फायद्याचं आहे. कोबीमध्ये सल्फोरेपेन नावाचं रसायन असतं, जे शरीराचा कॅन्सरपासून बचाव करतं.

सोयाबिन - सोयाबिनमध्ये प्रोटीन आणि आयसोफ्लेवोंस असतं, जे हाडं कमकुवत होण्यापासून बचाव करतं. यातील प्रोटीन ग्लूकोज नियंत्रित करण्याचं काम करतं. मधुमेहाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

काजू - काजू व्हिटॅमिन, मिनरल्सचा चांगला स्त्रोत आहे. काजूमध्ये अॅमिनो अॅसिड आर्जिनिन आढळतं, ज्यामुळे पुरुषांमध्ये नायट्रिक ऑक्साइडची लेवल वाढवण्यास मदत होते. जे लैगिंक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. काजू खाल्याने मसल्स मजबूत होण्यासही मदत होते. 

रताळे - रताळ्यात व्हिटॅमिन ए असून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. पोटॅशियम असलेलं रताळं उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांपासूनही बचाव करतं.

चणे - फायबरयुक्त चणे स्वस्थ पचनासाठी फायदेशीर आहेत. चणे व्हिटॅमिन बी ६चा चांगला स्त्रोत आहे. दररोज भाजलेले चणे खाल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते.

  

कीवी - कीवी तणावापासून दूर ठेऊन, रक्तप्रवाह सुरळित ठेवते. कीवी अॅन्टीऑक्सिडेंट आणि फायबरचा चांगला स्त्रोत असून पचनक्रियाही उत्तम ठेवण्यास मदत करते.

डाळी - कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त डाळींमधून दिवसभरातील कामासाठी आवश्यक ती उर्जा मिळते.