महाराष्ट्राचा देशात विक्रम; इतक्या लोकांचा लसीचा दुसरा डोस ही पूर्ण

कोरोनाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरण मोहीमेला गती दिली आहे. दरम्यान बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 18 लाख 39 हजार 809 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 

Updated: Sep 9, 2021, 07:41 AM IST
महाराष्ट्राचा देशात विक्रम; इतक्या लोकांचा लसीचा दुसरा डोस ही पूर्ण title=

मुंबई : कोरोनाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरण मोहीमेला गती दिली आहे. दरम्यान बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 18 लाख 39 हजार 809 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. 

आतापर्यंत राज्यात एकूण 6 कोटी 55 लाखांवर डोस देण्यात आले आहे. देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने विक्रम केलाय. लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झालंय.

21 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 11 लाख 4 हजार 465, तर 4 सप्टेंबर रोजी 12 लाख 27 हजार 224 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यानंतर 12 लाख लसीकरणाचा विक्रम मोडत बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 14 लाख 39 हजार 809 लसींची डोस एका दिवसात देण्याची किमया आरोग्य विभागाच्या केली आहे. 

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या सांगण्यानुसार, लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचं सर्वाधिक लसीकरण झालं असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत. 

दरम्यान, लसीकरण मोहिमेला राज्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय.

लसीचा दुसरा डोस देण्यात देशात महाराष्ट्र अग्रस्थानी

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला एकूण 6 कोटी 55 लाख 20 हजार 560 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख 78 हजार 805 जणांना लसींचे दोन डोस देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.