लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार

जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.

Updated: Oct 16, 2017, 07:21 PM IST
लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार title=

नवी दिल्ली : जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.

रिसर्चनुसार, टाईप-२ डायबिटीजने पीडित जास्तकरून ओव्हरवेट होतात आणि सिंगल लोकांमध्ये ओव्हरवेट होण्याची शक्यता विवाहीत लोकांपेक्षा दुप्पट असते. ओव्हरवेट असल्याने तुमच्या धमन्यांना नुकसान पोहोचतं. ज्यामुळे हळूहळू तुमचं शरिर कमजोर होतं. शोधानुसार, सिंगल लोकांमध्ये ओव्हरवेट होण्याची शक्यता विवाहीत लोकांपेक्षा अधिक असते. विवाहीत लोकांमध्ये स्लिम राहण्याची शक्यता अधिक असते. 

शोधामध्ये टाईप-२ डायबिटीजने पीडित २७० रूग्णांवर ६ वर्ष अभ्यास करण्यात आलाय. या २७० लोकांमधील १८० लोक विवाहीत होते. यात १०९ पुरूष आणि ७१ महिला होत्या. जे लोक विवाहीत होते त्यांचा बॉडी मास इंडेक्स २४.५ होता. तर सिंगल लोकांमध्ये तो २६.५ इतका होता. 

या शोधाच्या शेवटी अभ्यास या निष्कर्षावर पोहोचले की, विवाहीत लोकांमध्ये सिंगल लोकांच्या तुलनेत जाड होण्याची शक्यता ५८ टक्के कमी असते. त्यामुळे जर तुम्ही सिंगल असाल, तर लवकर लग्न केलेलं कधीही चांगलं. नाही तर डायबिटीज होणं अधिक महागात पडू शकतं.