'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे

Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही.  नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 11, 2024, 03:40 PM IST
'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे   title=

Symptoms of Herpes News In Marathi : देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. तसेच काही संसर्ग आजारांमध्ये अनेकांचा समज-गैरसमज असतात.  यामध्ये काजण्या म्हणा किंवा त्वचा रोग यांसारखे आजार संसर्गजन्य आहेत. यातीलच एक आजार म्हणजदे नागीण. नागीण हा संसर्गजन्य त्वचा रोग आजार असून या आजारामध्ये शरीरावर विशिष्ठ प्रकारचे लालसर बारीक फोड येतात. या फोडांमुळे त्वचेची प्रचंड जळजळ होते. तसेच प्रचंड वेदना ही होतात. हे फोड हळूहळू वाढतात. तसेच अनेकदा ते एखाद्या चठ्ठ्याप्रमाणे वाढतात. त्वचेवर  आलेल्लाय या फोडांचा किंवा पुरळांचा विळखा पूर्ण झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. असा अनेकांचा समज आहे. 

नागिण या आजाराला इंग्रजीमध्ये Herpes Zoster  असं देखील म्हणतात. त्वेचा संसर्ग हा आजार कोणालाही होवू शकतो. शक्यतो 40 वयानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. हा वेरिसेला झोस्टर या कांजण्यांच्या विषाणूमुळे होते. यामध्ये शरीरावर पाण्याचे बारीक पुरळ किंवा फोड येतात. ज्यामुळे शरीराला खाज सुटते, जळजळ होते, वेदना आणि ताप येतो. हा एक संसर्गजन्य आजार असल्याने यात वेळीच काळजी  घेणे निरोगी आरोग्यासाठी कधीही चांगले ठरते. 

 नागीण आजाराची लक्षणे

- नागीण आजारात काही सामान्य लक्षणे म्हणजे थंडी, ताप येणं तसेच डोकेदुखी यासारखी लक्षण आढळतात.

- तसेच थकवा जाणवणे आणि पोटदूखीचा त्रास होतो. 

- काही दिवसांनंतर गंभीर लक्षणे दिसू शकतात यात काही ठिकाणी त्वचा लाल होऊ शकते. त्वचेच्या विशिष्ट भागात फोडी वाढतात.

- त्वचा संसर्ग झाला तर फोड पाण्याने भरणं तसेच फोड आलेल्या ठिकाणी वेदना होणं अशी लक्षणे दिसू लागतात. 

हा आजार किती दिवसात बरा होतो? 

लक्षणे दिसू लागल्यापासून साधारण 3-4 किंवा अगदी 5 आठवडे लागू शकतात किंवा त्यावर मात करण्यासाठी एक महिना लागू शकतो. हे पुरळ साधारणपणे शरीरावर कंबरेच्या भागात, छातीच्या भागात, डोक्याभोवती किंवा कधी कधी चेहऱ्यावर दिसू लागतात.  तसेच  सुरुवातीच्या काळात बारीक पुरळ येण्यास सुरुवात होते.  कालांतराने, सामान्य 5-6 दिवसात त्यात पाणी भरु लागतं. कधीकधी ते 15 दिवसात सुकतात. पूर्ण बरे होण्यासाठी फक्त 2-3 आठवडे लागतात.

नागीणीवर उपचार कोणते? 

डॉक्टरांच्या सल्लानुसार नागिणी उपचार केल्यातर हा आजार लवकर बरा होऊ शकतो. या आजारावर Acyclovir हे विषाणूविरोधी औषध आहे. याशिवाय फॅमसीक्लोव्हिर आणि व्हॅलासायक्लोव्हिर हीच औषधे रुग्णाला दिली जातात. खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी डॉक्टर मलम देखील देतात. जर एखाद्या रुग्णाला तीव्र वेदना होत असतील तर त्याला झोस्टाव्हॅक्स लस दिली जाते. 

नागिनी आजारावर करा घरगुती उपचार

थंड पाण्याची आंघोळ - दिवसातून दोनदा थंड पाण्याने आंघोळ करावी.  याने शरीरातील खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटत असेल तर आंघोळीपूर्वी एक कप कोमट पाण्यामध्ये ओट्स आणि कॉर्नस्टार्च मिसळा. हे मिश्रण 10-15 मिनिटे आंघोळीच्या गार पाण्यात मिसळा. तसेच नागिण हा आजार असेल तर गरम पाण्याची आंघोळ टाळावी. यामुळे त्रास अधिव वाढण्याची शक्यता असते. 

थंड शेक - नागिण आजारापासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करण्यासोबतच थंड पाण्याचा शेकही घेऊ शकता. यासाठी टॉवेल किंवा रुमाल पाण्यात भिजवा आणि नंतर जखमेवर ठेवा.

यामुळे वेदना आणि जळजळ कमी होईल. मात्र हे शेकवताना कधीही बर्फ किंवा आइसपॅकचा वापर करु नका. यामुळे वेदना आणखी वाढू शकतात.

कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा - नागिण आजारामध्ये होणारी जळजळ आणि खाज सुटण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय वापरू शकता.

कॉर्नस्टार्च किंवा बेकिंग सोडा थोडे पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. फक्त पेस्ट नागिण आलेल्या भागावर लावल्याने 10 ते 15 मिनिटांनी पेस्ट थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.