निपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका

 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Updated: May 24, 2018, 12:36 PM IST
निपाह व्हायरसची दहशत ; ही ३ फळे चुकूनही खावू नका title=

मुंबई : 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 'निपाह' व्हायरस असल्याची घोषणा केली आहे. मनिपाल यूनिवर्सिटी इपीडेमियोलॉजी विभागानुसार. निपाह व्हायरस लाळेतून पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरतो. 

केरळवरुन येणारी फळे

केरळमध्ये पसरलेल्या निपाह व्हायरसचा इतर ठिकाणी धोका नसला. तरी बचावात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे केरळवरुन येणारी फळे खाणे टाळा. फळे खाताना स्वच्छ धुवूनच खा. खजूर, आंबा धुवून खा. रमजानचा महिना सुरु आहे त्यामुळे केळी, खजूर ही फळे केरळमधून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. मात्र केरळमध्ये निपाह व्हायरसची दहशत पाहता हे खाणे टाळणे अतिशय गरजेचे आहे.

निपाह व्हायरस काय आहे?

  • या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.
  • हा व्हायरस वटवागुळात असतो. 
  • १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले. 
  • २००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.
  • सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.

काय आहेत लक्षणं?

  • ३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.
  • २४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.
  • इंफेक्शनच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.
  • न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.
  • अंगदुखी.

काय काळजी घ्याल?

  • झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.
  • या व्हायरसने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.
  • खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.