Nipah Virus बाबत नवा खुलासा, 17 वर्षांंपूर्वी भारतात झाला दाखल

केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचं थैमान पसरले आहे. 

Updated: May 27, 2018, 08:22 PM IST
Nipah Virus बाबत नवा खुलासा, 17 वर्षांंपूर्वी भारतात झाला दाखल  title=

मुंबई : केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचं थैमान पसरले आहे. गेल्या आठ्वड्याभरात निपाह व्हायरसमुळे 13 रूग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र लॅबटेस्टमध्ये केरळमध्ये पसरत असलेल्या 'निपाह' व्हायरसचा प्रमुख स्त्रोत वटवाघूळ नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मग हा जीवघेणा व्हायरस नेमका आला कोठून याबाबतचं गूढ सध्या वाढलं आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस

भारतात 17 वर्षांपूर्वीच आला 'निपाह'  

'निपाह'चा वाढता धोका पाहता सध्या सरकारने याबाबत देशभरात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 'निपाह' केरळमध्ये पहिल्यांंदा नव्हे तर 17 वर्षांपूर्वीच भारतामध्ये दाखल  झाला आहे. मात्र केरळमध्ये अचानक या व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाणा वाढल्याने भीती निर्माण झाली आहे. लॅब टेस्टने मात्र केरळमधील साथीमागे वटवाघुळ नसल्याचं स्पष्ट केले आहे

लॅबटेस्टचा खुलासा 

केरळमधील कोझिकोडे भागात वेटरनेरी टीमने विहीरीत सापडलेल्या वटवाघुळांची तपासणी केली. मात्र ही वटवाघुळं फ्रुट बॅट या जातीची नाहीत असा खुलासा केला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)ने वटवाघुळांचे सॅम्पल नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (पुणे)  येथे पाठवली आहेत. विहिरीत मेलेली वटवाघुळं सापडल्याने पाण्यातून 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक अंदाज मांडण्यात आला होता.  'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात

आश्चर्यकारक खुलासा 

निपाह व्हायरसमुळे अवघ्या 4 दिवसांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार मानवी शरीरात निपाह व्हायरस 11 वर्ष सुप्तावस्थेतही राहू शकतो. 2001 साली सिलीगुडी भागात या व्हायरसचा पहिला बळी गेला होता. त्यामुळे संक्रमित व्यक्तीमध्येच हा व्हायरस पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाल्याने आजार पसरल्याची माहिती देण्यात आली आहे.  'निपाह' बाबत आश्चर्यकारक खुलासा ! हा सगळ्यात घातक व्हायरस नव्हे

देशभरात अलर्ट 

रिपोर्टच्या माहितीनुसार, सुरूवातीला प्रभावित झालेल्या भागांमध्येच पुन्हा 'निपाह' व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असावा. त्यानुसार दोन लोकांच्या संपर्कात येण्याने  हा व्हायरस पसरत असावा. त्यामुळे गर्दीची ठिकाणं टाळा, मास्क, ग्लोव्ह्जचा वापर करा. तसेच 'निपाह' संबंधित लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला आणि चाचण्या करण्यचा सल्ला देण्यात आला आहे. मग अशा स्थितीत Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का? सोबतच जाणून घ्या ​निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय...