पावसाळ्यात चप्पल चावते? करा 'हे' घरगुती उपाय... रहाल टेंशन फ्री!

Remedies for Shoe Bite in Rainy Season: पावसाळ्यात चप्पल लागणं ही समस्या कॉमन आहे त्यामुळे या लेखातून तुम्ही जाणून घेऊया की तुम्ही नवीन चप्पल घेतल्यावर चप्पल लागू नये म्हणून आणि चप्पल लागल्यानंतर काय उपाय करावेत? 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 14, 2023, 04:03 PM IST
पावसाळ्यात चप्पल चावते? करा 'हे' घरगुती उपाय... रहाल टेंशन फ्री! title=
July 14, 2023 | Remedies for Shoe Bite in Rainy Season latest health news in marathi (Photo: DNA.com)

Remedies for Shoe Bite in Rainy Season: सध्या पावसाळ्याचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या मौसमात घेतल्या जाणाऱ्या काळजीची. आपल्याला हरतऱ्हेची काळजी ही पावसाळ्यात घेणे गरजेचे असते. त्यातून सर्वात म्हत्त्वाची बाब असते ती म्हणजे चप्पलेची. आपण जर का चांगली चप्पल परिधान केली तर आपल्यालाही त्याचा फायदाच होतो. खासकरून पावसाळ्यात आपल्याला वेगळ्या पावसाळी चप्पला घेणे बंधनकारक असते त्यामुळे आपण तशा चपलाही शोधायला जातो त्यातून आपल्याला माहितीच असते की जर का आपण चांगलीच चप्पल खरेदी केली नाही तर आपल्याला चपल्यांच्या चामड्यांचा भाग पावसाच्या पाण्यामुळे लागू शकतो आणि त्वेचेवर घासल्या गेल्यामुळे त्या चप्पलनं जखमही होते आणि मग आपल्यालाही नाना तऱ्हेचे उपाय करावे लागतात. परंतु वर precaution is better than cure असं म्हणतात ते काही खोटं नाही. 

तेव्हा या पावसाळ्यातही तुम्ही आपल्या पायांची काळजी घेऊ शकता आणि त्याचा तुम्हाला पुरेपुर फायदा होऊ शकतो. परंतु जर का चुकून तुम्ही कुठली अशी चप्पल घेतलीत जी तुमच्या पायाला चावते आहे किंवा त्यानं तुम्हाला जखमा होत आहेत तर काळजी करू नका कारण त्यानंतर तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शकतो. अनेकदा अशा चप्पला या चुकीचे फॅब्रिक निवडल्यामुळे आपल्याला त्रास देऊ शकतात. तेव्हा अशावेळी कोणते उपाय करावेत याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते. तेव्हा या लेखातून आपण या सर्व उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा पाहुया की तुम्ही नक्की कोणत्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. 

हेही वाचा  - सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मागील 12 वर्षांपासून नंबर 1 वर आहे 'हा' अभिनेता

तुम्हाला जर का वाटतं असेल की नवी नवी पावसाळी चप्पल घेऊनही जर का तुम्हाला चप्पल लागते आहे तर तुम्हाला त्याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. चप्पलं लागते आहे असं वाचतंय किंवा चावते आहे असं वाटतंय कर तातडीनं बॅंण्डेज किंवा मलमपट्टी करा. जर का रक्त वैगेरे येत असेल तर त्यानुसार तुम्ही त्यावर हळदही लावू शकता. परंतु साधा उपाय म्हणजे अधिक इजा होऊ नये म्हणून तुम्ही पायाला तेल लावू शकता. 

चपला चावू नये म्हणून 'ही' घ्या काळजी

1. अनेकजण असं म्हणतात की जर का तुम्हाला चप्पल लागत असेल तर तुम्ही पायात चपला किंवा सॅण्डलच्या आत तुम्ही मोजे घालू शकता. तेव्हा अनेक जणं म्हणतात की, मोजे घालू नयेत कारण तसेही ते ओलेच होतात. परंतु तुम्ही योग्य ते कापड वापरून पाय ओले होणार नाहीत म्हणून त्याची काळजी घेऊ शकता.

2. प्रोटेक्टर किंवा टो कॅप्स घालू शकता. त्याचसोबत तुम्ही शु पॅड्सही किंवा इन्सोल्स घालू शकता. मुख्यत्वे पायांना इजा होईल अशा चपला घेऊ नका त्यातून टाईट फिंटिंगच्या चपला टाळा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)