सोफ्यावर झोप म्हणजे व्याधींना आमंत्रण, नक्की काय त्रास होतो, जाणून घ्या...

सोफ्यावर अधिक तास झोपणं (Sleeping On Sofa) हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

Updated: Jul 2, 2021, 07:31 PM IST
सोफ्यावर झोप म्हणजे व्याधींना आमंत्रण, नक्की काय त्रास होतो, जाणून घ्या... title=
मुंबई : आपल्या पैकी अनेकांना सोफ्यावर बसून तसेच झोपून टीव्ही पाहायला आवडते. अनेकदा आपण टीव्ही पाहता पाहता सोफ्यावरच झोपून (Sleeping On Sofa) जातो. पण सोफ्यावर झोपल्याने अनेक व्याधी निर्माण होतात. याबाबत फार कमीच जणांना माहितीये. (sleeping on sofa is dangerous for health)
 
सोफ्यामध्ये स्पंजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे सोफ्यावरुन झोपून उठल्यावर कंबरदुखीचा त्रास जाणवू लागतो. गादीच्या तुलनेत सोफा फार नरम असतो. यासाठी स्पंजचा वापर केला जातो. हा स्पंज पाहण्यासाठी नरम वाटतो, पण आरोग्यसाठी तो तेवढाच धोकादायक असतो. 
 
सोफ्यावर झोपताना पाय पसरायला आणि कुस बदलण्यासाठी प्रयाप्त जागा नसते.  त्यामुळे नाईलाज म्हणून आपण एकाच अवघडलेल्या स्थितीत झोपतो. यामुळे कंबर आणि शरीराच्या इतर भागांना याचा दुष्परिणाम जाणवतो. 
  
सोफ्यावर काही तांसासाठी झोप घेऊ शकता. पण 7-8 तासांसाठी झोपं घेण्यासाठी सोफा योग्य नाही. सोफ्यावर झोपल्याने अवघडलेल्या स्थितीत झोपावं लागतं. त्यामुळे शरीराला आराम मिळण्याऐवजी अंग दुखायला लागतं.  त्यामुळे जर तुम्ही सोफ्यावर झोपत असाल, तर आत्तापासूनच ती सवय बदला, अन्यथा तुम्हाला व्याधींचा सामना करावा लागू शकेल.  
 
संबंधित बातम्या :