कार्डिएक अरेस्टमधून वाचण्यासाठी नेमकं काय कराल?

बॉलिवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचा आकस्मात निधन झालं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 26, 2018, 02:13 PM IST
कार्डिएक अरेस्टमधून वाचण्यासाठी नेमकं काय कराल? title=

मुंबई : बॉलिवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचा आकस्मात निधन झालं. 

शनिवारी रात्री उशिरा दुबईत निधन झालं. श्रीदेवी यांचं निधन कार्डिएक अरेस्ट झालं. या झटक्यात माणसाचा तातडीने मृत्यू होतो. अशावेळी अनेकदा प्रश्न पडतो की कार्डिएक अरेस्टची लक्षणं काय किंवा अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी? 

कार्डिएक्ट अरेस्टची लक्षणे काय? 

डॉक्टर केके अग्रवाल यांच्या माहितीनुसार, कार्डिएक्ट अरेस्ट याची फार कमी लक्षण आहेत. शरिर अस्वास्थ जाणवल्यास तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. यावेळी अचानक बीपी कमी होतो, शरीर पिवळं पडणं, हृदयाचे ठोके अनियमित जाणवणं, पल्स बंद होणं यासारखी लक्षणं कार्डिएक्ट अरेस्टमध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे श्वास घेताना त्रास होणं आणि छातीत दुखणं ही देखील याची लक्षणं आहेत. 

कार्डियो - पल्मोनरी रेसस्टिसेशन आहे यावर उपाय 

जर कुणा व्यक्तीला कार्डिएक्ट अरेस्ट झालं तर कार्डियो - पल्मोनरी रेसस्टिसेशन पाहून त्यावर उपाय करू शकतात. 

कार्डिएक्ट अरेस्ट स्थितीत नेमकं काय करावं? 

कार्डिएक्ट अरेस्ट झालेल्या व्यक्तीला तातडीने जमिनीवर झोपवा. संपूर्ण शरिराला हवा लागू द्या ज्यामुळे तिच्या संपूर्ण शरिराला ऑक्सिझन पुरवठा होतो. त्यानंतर डोक्याला वरच्या बाजूला उचला आणि छातीत जोर जोरात पुश करा. या प्रक्रियेला कार्डिएक्ट थंप असं म्हणतात.