दाढी ठेवणे आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण तर लुक चांगला दिसावा म्हणून दाढी ठेवतात. दाढीमुळे जसा पुरुषांच्या लूक जसा बदलतो तसेच दाढी ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत.

Updated: Sep 15, 2017, 10:37 AM IST
दाढी ठेवणे आरोग्यासाठीही आहे फायदेशीर title=

मुंबई : पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण तर लुक चांगला दिसावा म्हणून दाढी ठेवतात. दाढीमुळे जसा पुरुषांच्या लूक जसा बदलतो तसेच दाढी ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत.

सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. तसेच यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचीही भिती असतो. शरीरावर कपडे असल्याने यूव्ही किरणांपासून तर रक्षण होते. मात्र, आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात असतो. दाढीमुळे चेहऱ्याचा खालच्या अर्ध्या भागाचे यूव्ही किरणांपासून रक्षण होते. 

जे पुरुष सतत शेव्ह करतात त्यांच्या चेहऱ्यावर डाग तसेच कट मार्क्स असतात. दाढी वाढवल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.

जेव्हा तुम्ही शेव्ह करता तेव्हा उन्हाळ्यात त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्कात येते आणि थंडीत त्वचा कोरडी होते. दाढी असल्यास त्वचेवरील नॅचरश मॉइश्चर कायम राहते. जे पुरुष सतत दाढी करतात त्यांना रॅशेस, इन्फेक्शन सारख्या समस्या सतावतात.