पावसाळ्यात इंफेक्शन टाळण्यासाठी या ५ गोष्टींची खबरदारी घ्या!

उन्हाळ्यानंतर पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात.

Updated: Jun 29, 2018, 10:07 AM IST
पावसाळ्यात इंफेक्शन टाळण्यासाठी या ५ गोष्टींची खबरदारी घ्या! title=

मुंबई : उन्हाळ्यानंतर पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. पावसात भिजणे, मस्ती करणे प्रत्येकालाच आवडते. पण पावसाचा आनंद लूटत असताना अनेक आजार, इंफेक्शनला निमंत्रण मिळते. पण काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास इंफेक्शनपासून सुरक्षित राहू शकाल. तर मान्सूनचा आनंद लुटताना या गोष्टींची खबरदारी घ्या...

हातांची स्वच्छता

अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात तर याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.

खाण्या-पिण्याच्या सवयी

पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाणे महागात पडू शकते. त्यामुळे या मौसमात नेहमी घरात शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.

काय खावू नये?

एरव्ही पोष्टीक ठरणाऱ्या पालेभाज्या पावसाळ्यात खाणे टाळावे. कारण त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो. तळलेले पदार्थांचे प्रमाण कमी करावे. तर मीठाचा वापरही नियंत्रणात असावा. 

शरीराची स्वच्छता

पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि घाम त्वचेवर राहील्याने इंफेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून दोनदा अंघोळ करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर अंग पुसण्यासाठी कोरडा टॉवेल वापरावा. कारण या मौसमात फंगल इंफेक्शन होण्याची संभावना असते.