पावसाळ्यात Fungal Infection पासून दूर राहण्यासाठी घ्या ही काळजी

 पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका कशी मिळवायची हे आम्ही आज सांगणार आहोत.  

Updated: Jun 19, 2022, 07:16 AM IST
पावसाळ्यात Fungal Infection पासून दूर राहण्यासाठी घ्या ही काळजी title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत अनेक आजार होण्याची शक्यता असते. यातील अनेक आजार त्वचेशी संबंधित असतात. यात फंगल इन्फेक्शनचाही समावेश असतो. या काळात बुरशीजन्य संसर्गामुळे अनेकजण आजारी त्रस्त असतात. त्यामुळे पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका कशी मिळवायची हे आम्ही आज सांगणार आहोत.  

फंगल इन्‍फेक्‍शन

बुरशी निर्माण करणारे बॅक्टेरिया सहसा पावसाळ्यात वेगाने पसरतात. हे विषाणू सहसा बोटांच्या टोकांवर, दोन बोटांच्या मधल्या भागात मोकळ्या जागेत अधिक वेगाने पसरतात. 

कसं होतं इन्फेक्शन?

अनेकदा या पावसाळ्यात लोक हलक्या रिमझिम पावसात भिजल्यानंतर त्वचेकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही छोटीशी निष्काळजी कधीकधी बुरशीची लागण होण्याचे कारण बनू शकते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छता ठेवणे अतिशय आवश्यक असते. 

बचाव कसा करावा?

फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी त्वचा जास्त काळ ओली राहणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. टाळूमध्ये फंगल इन्फेक्शनची लक्षणे सामान्य फंगल इन्फेक्शनपेक्षा वेगळी असतात. सामान्यतः हे टाळूवर लहान फोड, मुरुम किंवा चिकट थराच्या स्वरुपात दिसून येतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तज्ञांची मदत घ्या.