झोपण्याआधी चुकून पण खाऊ नका या 4 गोष्टी, नाहीतर शरीराला मोठा धोका

झोपण्यापूर्वी या गोष्टी खाणं टाळायला हवं

Updated: Feb 15, 2022, 06:00 PM IST
 झोपण्याआधी चुकून पण खाऊ नका या 4 गोष्टी, नाहीतर शरीराला मोठा धोका title=

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आरोग्याचा झोपेशी खूप जवळचा संबंध असतो. झोपेची कमतरता माणसाला अनेक धोकादायक आजारांना बळी पाडू शकते. जर तुम्ही ही कमी झोप घेता किंवा झोपण्याआधी या गोष्टी खाता.

तर आताच थांबा. एकदा तुम्ही खात असलेल्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या. कारण अशा काही गोष्टींबद्दल आहेत, ज्या खाल्ल्याने तुमची झोप उडते. त्यामुळे झोपण्यापूर्वी या गोष्टी खाणं टाळायला हवं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कॉफी, चहा असे घटक तुमच्या झोपेवर गंभीर परिणाम करु शकतात. यासोबतच झोपण्यापूर्वी टोमॅटो खाणे योग्य नसते. कारण त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागत नाही.

कारण टोमॅटोमुळे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो. म्हणजेच काय तर पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. एका रिपोर्टनुसार, टोमॅटोमुळे तुमची अस्वस्थता वाढू शकते आणि मग तुम्हाला पुरेशी आणि शांत झोप मिळण्याची शक्यता फारच कमी होते.

याशिवाय कांदा ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या पचनसंस्थेला त्रास देऊ शकते. समोर आलेल्या रिपोर्टनुसार कांदा पोटात गॅस तयार करण्याचे काम करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कच्चा किंवा शिजवलेला कांदा अशी समस्या निर्माण करू शकतो.

कांदा किंवा टोमॅटो सारख्या गोष्टींबरोबरच अल्कोहोल आणि कॅफिन या घटकांच्या प्रमाणाचे निरीक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या झोपेवर परिणाम करणारे कॅफिन विविध खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये आढळतात. चहा, कॉफी आणि विविध फिजी पेयांमध्ये कॅफिन आढळते. हे चॉकलेट आणि वेदना कमी करणाऱ्या औषधांमध्ये ही आढळू शकते.

झोपेच्या कमतरतेचा आपल्या मेंदूच्या कार्यावर तसेच आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. जे लोक दिवसातील सात तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचे वजन नियंत्रणात नसते आणि सामान्य लोकांच्या तुलनेत त्यांना लठ्ठपणाचा धोका असतो.