पुरूषांंच्या या '5' गोष्टींंवर स्त्रिया होतात 'लट्टू'

प्रेमात पडल्यावर मुलांनीच पुढाकार घेऊन प्रपोझ करायला हवं असा काही नियम नाही. मुलींनादेखील 'लव्ह अ‍ॅट फस्ट साईट' होतं.

Updated: Oct 30, 2018, 02:05 PM IST
पुरूषांंच्या या '5' गोष्टींंवर स्त्रिया होतात 'लट्टू'  title=

मुंबई : प्रेमात पडल्यावर मुलांनीच पुढाकार घेऊन प्रपोझ करायला हवं असा काही नियम नाही. मुलींनादेखील 'लव्ह अ‍ॅट फस्ट साईट' होतं. मात्र त्याची कबुली त्या पुढाकार घेऊनच  देतील असे नसते. मुलीदेखील मुलांना पडताळून पाहत असतात. त्या मुलांमध्ये काही खास गोष्टी पाहत असतात. त्यापैकी या 5 गोष्टी मुलांमध्ये असतील तर त्या त्याच्यावर लट्टू होऊ शकतात. 

हुशारी 

संशोधनानुसार समोर आलेल्या अहवालात महिलांना चांगलं जानरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान असलेली मुलं आवडतात. महिलांना असे वाटते की पुरूष लहान मोठ्या भांडणांचा बाऊ करत बसत नाहीत त्यामुळे विनाकरण घरात मोठी भांडणं होत नाहीत. 

संवेदनशीलता 

पुरूषांमधील संवेदनशीलता महिलांना अनेकदा भावते. संवेदनशील पुरूष मनाने  साफ असतो. 

सेन्स ऑफ ह्युमर 

चांगल्या सेन्स ऑफ ह्युमरचे पुरूष मुलींना अधिक भावतात. चांगला सेन्स ऑफ ह्युमर असलेले पुरूष स्वतः आनंदी राहतात सोबतच त्यांच्या आजुबाजूची लोकंदेखील आनंदात राहतील याची खात्री करतात. 

स्वयंपाकाची आवड 

स्वयंपाकघर आणि स्त्री हे काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रीची हुकुमत असणारं एक घरातील  स्थान होत. मात्र आता स्त्रियादेखील पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात त्यांच्या करियरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वयंपाकघरात प्रसंगी नवर्‍याची साथ स्वयंपाकघरातही मिळावी असे तिलाच वाटूच शकते. एका रिसर्चमध्ये सुमारे 80 % महिलांना स्वयंपाकघराची आवड असलेले पुरूष महिलांना आवडत असल्याचे समोर आले आहे. 

हेल्पिंग नेचर - 

मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे पुरूष तरूणींना अधिक आकर्षित करतात. असे पुरूष सहाजिकच स्त्रियांना मदत करण्यासाठी पुढे येतात.