रंगांच्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी खास टीप्स

यापासून वाचण्यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आल आहोत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 1, 2018, 06:32 PM IST
रंगांच्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी खास टीप्स title=

मुंबई : रंगपंचमीची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. खासकरून मुलांना तर या सणाची जास्तच ओढ लागलेली असते. मात्र, रंग उधळण्याच्या गोंधळात आपल्याला काही समस्यांचाही सामना करावा लागतो. रंग आपल्या डोळ्यात, केसात गेल्याने जळजळ व्हायला लागते. तसेच अ‍ॅलर्जी किंवा खास अशाही समस्या होतात. यापासून वाचण्यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आल आहोत. 

अशी घ्या काळजी

- होळीच्या पहिल्या दिवशी पूर्ण शरीराला सरसोचं तेल लावा. चेहरा, हाथ आणि पायांवर तेल चांगल्याप्रकरे लावा. कारण हे असे अंग आहेत जे रंगांसोबत थेट संपर्कात येतात. हे तेल तुमच्या त्वचेला सुरक्षित ठेवेल आणि सहज तुमच्या शरीरावरील रंग निघतील. 

- तेल नसेल तर तुम्ही लोशनचाही वापर करू शकता. हे तुमची त्वचा साफ ठेवण्यासाठी प्रभावी साधन आहे. याचा वापर केल्यास कठोरात कठोर रंगही निघेल. 

- आपल्या केसांमध्ये खूप सारं खोब-याचं तेल लावा. असे केल्यास रंग केसांच्या मुळापर्यंत जात नाही. याने तुमचे केस सुरक्षित राहतात. 

रंग डोळ्यात आणि तोंडात गेल्यास

- जर कोरडा रंग तुमच्या डोळ्यात गेला तर डोळे पाण्याने चांगल्याप्रकारे धुवून घ्या. डोळे परत परत पाण्याने धुवून साफ करा.

- डोळ्यांमधून रंग साफ केल्यानंतर डोळ्यात गुलाबजल टाका आणि थोडावेळ लेटून रहा. याने तुमच्या डोळ्यांना आराम आणि थंडावा मिळेल. 

- तसे तर रंगपंचमीला खेळले जाणारे रंग सुरक्षित असतात. पण काही लोक रासायनिक रंगांचा वापर करतात. याच रंगांमुळे तुमची त्वचा बेकार होऊ शकते.