पावसात भिजलेले शूज झटपट सुकवणार्‍या 4 खास ट्रिक्स

  आज दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेकांना साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत पुढे जावे लागले. 

Updated: Jul 3, 2018, 08:22 PM IST
पावसात भिजलेले शूज झटपट सुकवणार्‍या 4 खास ट्रिक्स  title=

मुंबई :  आज दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेकांना साचलेल्या पाण्यातून रस्ता काढत पुढे जावे लागले. अनेकजण आज पायपीट करत घरी किंवा कामाच्या ठिकाणी पोहचले आहेत. यामध्ये तुमचे शूज भिजले असतील. भिजलेले शूज वेळीच योग्यप्रकारे न सुकवल्याने त्याला दुर्गंध येतो. 
ओल्या शूजमध्ये पाय अधिक वेळ राहिल्यास आणि त्याचा वापर केल्यास पाय दुखतात. त्यातही तुमचे शूज कॅन्व्हासचे असतील तर ते सुकवणं कठीण असते. मग या ट्रिक्सने तुम्हांला शूज सुकवायला मदत होईल.  ... म्हणून मधुमेहींसाठी पाऊस आणि साचलेल्या पाण्यातून चालणं धोकादायक

कसे सुकवाल शूज? 

#1 शूजमध्ये वर्तमानपत्राचे बोळे करून ठेवा. यामुळे पेपरमध्ये पाणी शोषले जाईल. या उपायाने शूज सुकायला मदत होते. 

#2 शूज सुकवायचे असतील तर ते वीटेवर ठेवा आणि त्याला सूर्यप्रकाशात किंवा हवेशीर जागी ठेवा.  

#3 टॉवेलमध्ये शूज गुंडाळून त्यावर हीटरने ब्लो ड्राय करा. यामुळे झटपट शूज सुकायला मदत होते. 

#4 शूजमध्ये तुम्ही हॉटपॅड्स ठेवूनही ते झटपट सुकवू शकता. शूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येतेय... करा हा उपाय!