शूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येतेय... करा हा उपाय!

शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात... ही समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर त्यावर एक साधा आणि सोप्पा उपाय आहे.... कांदा.... होय कांदा.

Updated: Dec 10, 2015, 09:06 AM IST
शूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येतेय... करा हा उपाय! title=

मुंबई : शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात... ही समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर त्यावर एक साधा आणि सोप्पा उपाय आहे.... कांदा.... होय कांदा.

रात्री झोपताना अगोदर पाय स्वच्छ धुवून घ्या आणि पायमोजे पायांत घालून घ्या. कांद्याच्या छोट्या छोट्या चकत्या करत त्या पायमोज्यांत घालून दुर्गंध येत असलेल्या भागाजवळ ठेवा... आणि मग झोपा.... बघा तुमच्या पायाचा दुर्गंध कसा पटकन दूर होईल ते... पण, याच कांद्याच्या चकत्यांमुळे तुमच्या शरीराला इतर अनेक फायदेही होतात.... 

- कांद्यातील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे, पायांजवळ कांद्याच्या चकत्या ठेवल्यानं शरीरातल्या घातक जिवाणू आणि किटाणूंचा नाश होतो. कांद्यामधील फॉस्फरिक अॅसिड रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तशुद्धी होते.  

- कांद्याच्या उग्र वासामुळे खोलीतील हवा शुद्ध होतेच पण पायाची दुर्गंधीही नाहिशी होते. याने घात रसायनं आणि विषारी तत्त्व शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

- हा उपाय हृदयस्वास्थ्यासाठीही उपकारक ठरतो.
 
- पायाजवळ कांद्याच्या चकत्या असल्यानं पोटातील संसर्ग दूर होतो. त्याचबरोबर किडनीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
या उपायानं छोट्या आतड्यासंबंधीच्या त्याचप्रमाणे मूत्राशयासंबंधीच्या समस्याही दूर होतात.

- शरीरामध्ये अधिक उष्णता असणार्‍यांनी हा उपाय अवश्य करावा. याने अतिरिक्त उष्णता शोषली जाते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.

- त्वचेनजिक कांद्याच्या चकत्या असल्यास शरीराचं तापमान वाढत नाही. त्यामुळे ताप आलेल्या अवस्थेमध्ये हा उपाय अवश्य करावा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x