तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Updated: Sep 22, 2022, 09:58 PM IST
तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर? title=

Turmeric For Diabetes: आजकाल अनेकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यामुळे त्यांना आपल्या आरोग्याची विशेष अशी काळजी घ्यावी लागते. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. मधुमेह रूग्णांसाठी मसालेही फायदेशीर ठरू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? (turmeric will help you in control your sugar level see what is the exact reason)

होय, तुम्ही स्वयंपाक घरात वापरता त्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ तुम्हाला मधुमेह असल्यास फायदेशीर ठरू शकतो. तो म्हणजे हळद (Tumeric). हळदीत भरपूर आवश्यक गुणधर्म आहेत. त्वचेसाठी हळद तर एक रामबाण उपाय आहे. तेव्हा चला जाणून घेऊया त्वचेप्रमाणे हळदीचा मधूमेह रूग्णांसाठी कसा फायदा होतो? 

मधुमेह रूग्णांनी हळदीचे नियमित सेवन करावे कारण त्यात कर्क्युमिन (Cumermin) मुबलक प्रमाणात असते. या मसाल्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असते. हळदीचा वापर अनेक प्रकारे करता येतो.

1. आवळा आणि हळद (Amla and Turmeric)
हळद आणि आवळा हे दोन्ही मधुमेही रुग्णांसाठी औषधी मानले जातात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची (Cholesterol Level) पातळी कमी होते. याशिवाय आवळ्यामध्ये असलेले क्रोमियम कार्बोहायड्रेट्सचे (Chromium Carbohydrate) पचन करण्यास मदत करते. आवळा पावडर आणि हळद पावडर पाण्यात मिसळून प्यायल्यास ग्लुकोजची (Glucose Level) पातळीही नियंत्रित राहते. 

2. काळी मिरी आणि हळद (Black Paper and Turmeric)
हळद आणि काळी मिरी यांचे मिश्रण मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे दोन मसाले गरम दुधात मिसळून प्यायलाही काही हरकत नाही. काळ्या मिरीमध्ये पाइपरिन (Papyrine) नावाचे तत्त्व असते जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.

3. दालचिनी आणि हळद (Cinnamon and Turmeric)
हळद आणि दालचिनी पावडर घेऊन दुधात मिसळून गरम केल्यानंतर प्या. हेल्थ तज्ज्ञ न्याहारीच्या वेळी हे पिण्याची शिफारस करतात याद्वारे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करणे सोपे होते. दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-Inflammatory) आणि अँटी-ऑक्सिडंट (Anti-Oxidant) गुणधर्म असतात जे मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. 

(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)