...म्हणून उदभवते डोकेदुखी, वाचा कारणे !

जर एखाद्याला थंडी, ताप, सर्दी यासारखा आजाराचा त्रास असेल तर त्यावर लवकर उपचार केले जाऊ शकतात. पण काही असे आजार आहेत त्यावर मात करणे खूप अवघड जाते.

Updated: Dec 13, 2018, 07:22 PM IST
...म्हणून उदभवते डोकेदुखी, वाचा कारणे !  title=

मुंबई :जर एखाद्याला थंडी, ताप, सर्दी यासारखा आजाराचा त्रास असेल तर त्यावर लवकर उपचार केले जाऊ शकतात. पण काही असे आजार आहेत त्यावर मात करणे खूप अवघड जाते. याला 'मानसिक त्रास' असेही म्हणता येईल. डोक्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या वेदना अनेक आजारांचे स्पष्टीकरण देत असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना डोकेदुखीचा अधिक त्रास होतो. हा त्रास शरीरापेक्षा मानसिक रुपात आजारी पडणाऱ्या लोकांना जास्त होण्याची शक्यता असते. 

 कोणत्या स्वरुपाची डोकेदुखी कोणत्या आजाराचे कारण आहे पाहूया...   

१)मेंदू - जर तुमच्या मेंदूच्या भागास वेदना होत असेल, तर हे समजून घ्या की हे सामान्य दुखणे नाही. ही वेदना मायग्रेनची असू शकते. यासाठी नर्व्ह जबाबदार असतात. मेंदूतील वेदना बऱ्याचदा डोक्याच्या मध्यभागी अनुभवली जाते. आपल्याला असे अनुभव आल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) अधिक तणाव - डोके दुखीला बऱ्याचदा आपली मनःस्थिती कारणीभूत ठरते. जर आपल्या डोक्याच्या दोन्ही भागात वेदना होत असतील तर ते तणावग्रस्त आहे. तणावामुळे डोक्याच्या दोन्ही भागातील दुखण्याला सुरुवात होते.  

३) जास्त विचार केल्यामुळे - जेव्हा आपला मेंदू अनेक गोष्टींचा विचार करतो, तेव्हा देखील तिथे वेदनेला सुरुवात होते.  काहीवेळ आपण एखाद्या विचारात अडकलेलो असलो तरी आपल डोके दुखायला लागते.

४) इंद्रिये  -  खूप वेळ फोनवर जास्त बोलण्यामुळे किंवा डीजेच्या आवाजाने कानात विशेष प्रकारचा आवाज ऐकू येतो. ज्यामुळे डोकेदुखी जाणवते. कधीकधी सुगंधीत द्रव्यांच्य़ा गंधामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अर्थातच वेगवेगळ्या इंद्रियांमुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो.

५) पचनक्रिया - काहीवेळा डोकेदुखी डोक्याशी संबंधित नसून, पोटाशी संबंधित असते. शरीरातील पचनक्रिया योग्य पद्धतीने पार पडली नाही. तर  यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुमचे डोके सतत दुखत असेल तर ते अतिसाराचे लक्षण देखील असू शकते.