Morning Walk करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना? नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते

तुम्ही कधी विचार केला आहे की यामुळे तुमचे नुकसान होत आहे?

Updated: Sep 25, 2021, 12:23 PM IST
Morning Walk करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?  नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते title=

मुंबई : बऱ्याचदा लोक मॉर्निंग वॉक करताना मोबाईल फोन घेऊन आणि हेडफोन कानाला लावून चालत किंवा पळत असल्याचे तुम्ही पाहिले असणार. लोक एकटे वॉकला जाताता त्यामुळे त्यांचा विरंगुळा म्हणून किंवा इकडे तिकडे लक्ष विचलत न होण्यासाठी ते हेडफोनचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की यामुळे तुमचे नुकसान होत आहे?

काही लोक मॉर्निंग वॉक करताना गाणी ऐकतात, तर अनेक वेळा लोक फोनवर बोलत असताना चालतात. तज्ञांच्या मते, ही सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. ते तुम्हाला सर्वात जास्त कसे नुकसान करू शकते ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉडी पोश्चर खराब होतो

फोनच्या वापरामुळे शरीराच्या पोश्चरवरही त्याचा परिणाम होतो. तज्ञांच्या मते, चालताना पाठीचा कणा नेहमी सरळ असावा. तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा सर्व लक्ष फोनवर असते. ज्यामुळे पाठीचा कणा सरळ राहत नाही. जर तुम्ही बराच वेळ असे चालत असाल, तर ते शरीराचे पोश्चर खराब करते.

स्नायू दुखने

चालताना तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय असते आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, पण तुम्ही एका हातात मोबाईल धरून चालत असाल तर ते स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण करते. यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.

एकाग्रता कमी होणे

जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक दरम्यान मोबाईल फोन वापरता, तेव्हा तुमचे लक्ष पूर्णपणे चालण्याकडे नसते. असे चालल्याने तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही किंवा एकाग्रता ही तुम्हाला मिळणार नाही.

पाठदुखी

जर तुम्ही दीर्घकाळ मॉर्निंग वॉक करताना ही सवय कायम ठेवली तर यामुळे पाठदुखी होऊ शकते. त्यामुळे चालताना मोबाईल अजिबात वापरू नका.