Women's Health | महिलाच्या स्तनाग्रांमध्ये त्रास जाणवण्याची कारणं कोणती? चुकीच्या फिटींगचे अंतरवस्त्रदेखील ठरू शकतात कारणीभूत

  महिलांच्या स्तनाग्रांमध्ये (Nipple Pain in Women)दुखणे तसेत त्रास होणे ही सामान्य बाब आहे. परंतु त्यामागे अनेकदा गंभीर कारणं देखील असू शकतात.

Updated: Jul 15, 2021, 03:23 PM IST
Women's Health | महिलाच्या स्तनाग्रांमध्ये त्रास जाणवण्याची कारणं कोणती? चुकीच्या फिटींगचे अंतरवस्त्रदेखील ठरू शकतात कारणीभूत title=

मुंबई :   महिलांच्या स्तनाग्रांमध्ये (Nipple Pain in Women)दुखणे तसेत त्रास होणे ही सामान्य बाब आहे. परंतु त्यामागे अनेकदा गंभीर कारणं देखील असू शकतात. ज्याविषयी महिलांनी काळजी घ्यायला हवी. जास्त कालावधीपासून त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवे. महिलांच्या स्तनाग्रांमध्ये (Nipple) त्रास होण्याची काही कारण जाणून घेऊ या. 

स्तनाग्रांमध्ये त्रास जाणवत असल्याची लक्षणं

  • स्तनाग्रातून रक्त येणे
  • स्तनात गाठ होणे
  • स्तनाच्या आकार आणि रंगात बदल
  • स्तनाग्रांमध्ये खाज येणे
  • स्तनाग्रांमध्ये सूज येणे
  • ताप, मळमळ, उलटी 
  • याशिवाय बेशुद्ध पडणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणं गंभीर समस्येकडे इशारा करतात. यासाठी लगेच डॉक्टरांकडून तपासणी करायला हवी.

महिलांच्या स्तनाग्रांमध्ये का दुखते?(Women's Nipple Pain Reason)

1 स्तनाचा कर्करोग
स्तनाग्रांमध्ये दुखणे, त्रास होणे यामागे नेहमीच सामान्य कारणं असतील असे नाही. यामागे स्तनाचा कर्करोगाचेही कारण असू शकते. बऱ्याच कालावधीपासून स्तनात गाठ आणि स्तनाग्रांमध्ये त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.

2 चुकीचे अंतवस्त्र वापरणे
अनेकदा चुकीच्या फिटींगचे कपडे घातल्याने महिलांच्या स्तनाग्रांमध्ये त्रास सुरू होतो. टाइट किंवा चुकीच्या फिटिंगचे अंतरवस्त्र (Bra) घातल्याने स्तनाग्र रगडले जातात. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

3 इतर कारणं
संसर्ग, घाम, स्तनपान सारखे काही कारणांमुळे स्तनांग्र किंवा आजुबाजूला अन्य फंगल इंन्फेक्शन होऊ शकतो. कारण फंगसमुळे स्तनाग्रांच्या आजुबाजूच्या पेशींचे नुकसान होऊ शकते.