राम रहिमच्या आश्रमातून १८ तरूणींची सुटका, मेडिकल टेस्ट होणार

बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता राम रहिमच्या आश्रमावर कारवाई केल्याची माहिती आहे. मंगळवारी सिरसा येथील डेरा आश्रमावर कारवाई करण्यात आली. यावेळी आश्रमातून १८ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या तरूणींना आश्रमात शाही बेटी असं म्हटलं जात होतं. येथून सुटका केल्यावर त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे. 

Updated: Aug 29, 2017, 04:00 PM IST
राम रहिमच्या आश्रमातून १८ तरूणींची सुटका, मेडिकल टेस्ट होणार title=

सिरसा : बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता राम रहिमच्या आश्रमावर कारवाई केल्याची माहिती आहे. मंगळवारी सिरसा येथील डेरा आश्रमावर कारवाई करण्यात आली. यावेळी आश्रमातून १८ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या तरूणींना आश्रमात शाही बेटी असं म्हटलं जात होतं. येथून सुटका केल्यावर त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे. 

२४ तास हजर असायच्या २५० सेविका -

मीडिया रिपोर्टनुसार, गुरमीत राम रहीमने खास त्याची सेवा करण्यासाठी अनेक साध्वींना ठेवलं होतं. असे सांगितले जाते की, त्याच्या सेवेसाठी २०० ते २५० साध्वी असायच्या. या साध्वींना खास ट्रेनिंग दिलं जायचं आणि या साध्वींना अन्य पुरूषांसोबत बोलण्याची मनाई होती. इतकेच नाही तर साध्वी ज्या ठिकाणी राहत होत्या त्या परिसराच्या ८ ते १० फूट परिसरात पुरूषांना जाण्यासही बंदी होती. केवळ राम रहिम तिथे जाऊ शकत होता. 

अधिका-यांनी सांगितले की, ‘डेरा परिसरात आता साधारण १५०० लोक आहेत. डेरा आश्रम हे एका शहरासारखं आहे. ज्यात शाळा, घरे, कॉलेज, रूग्णालय, स्टेडियम आणि इतर सोयी-सुविधा आहेत. असा अंदाज आहे की, आश्रमात २ ते ३ हजार लोक आहेत.