भारतातल्या १०० श्रीमंतांमध्ये ७ महिला

फोर्ब्सनं भारतातल्या सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या १०० जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.

Updated: Oct 5, 2017, 05:58 PM IST
भारतातल्या १०० श्रीमंतांमध्ये ७ महिला title=
ओपी जिंदल समुहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदल (फाईल फोटो)

मुंबई : फोर्ब्सनं भारतातल्या सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या १०० जणांची यादी प्रसिद्ध केली आहे. १०० जणांच्या या यादीमध्ये सात महिला आहेत. ओपी जिंदल समुहाच्या सावित्री जिंदल आणि बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातल्या किरण मुजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.

फोर्ब्सच्या यादीमध्ये सावित्री जिंदल आणि परिवार ७.५ अरब डॉलर एवढ्या संपत्तीसह १६व्या क्रमांकावर आहे. तर ल्यूपिनचा गुप्ता परिवार ३.४५ अरब डॉलर संपत्तीसह ४०व्या क्रमांकावर आहे. ल्यूपिनच्या गैर-कार्यकारी अध्यक्ष मंजू देश बंधू गुप्ता आहेत. हॅवल्स इंडियाचे विनोद राय गुप्ता आणि परिवार ३.११ अरब डॉलर संपत्तीसह ४८ व्या क्रमांकावर आहेत.

बेनेट, कोलमॅन आणि कंपनीच्या इंदू जैन यांची संपत्ती ३ अरब डॉलर आहे. इंदू जैन या यादीमध्ये ५१ व्या क्रमांकावर आहेत. यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारींची संपत्ती २.१९ अरब डॉलर आहे. या क्रमवारीमध्ये त्या ७१ व्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या भारतीयांच्या यादीमझ्ये ७२व्या क्रमांकावर आहेत. शॉ यांच्याकडे २.१६ अरब डॉलर एवढी संपत्ती आहे.