7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मध्ये होणार 13% वाढ

 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी... सरकारने DA मध्ये 13% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

Updated: Apr 20, 2022, 11:59 AM IST
7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मध्ये होणार 13% वाढ title=

मुंबई : 7th Pay commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने अलीकडेच 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे.यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच डीए देण्यात येणार आहे.  आता या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच DA देण्यात येणार आहे. 

अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

वित्त मंत्रालयानुसार, 5 व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर 6व्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वाढवून 203 टक्के करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

सातव्या वेतन आयोगात 3 टक्के वाढ

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 3% वाढ केली आहे. यानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 34 टक्के झाला आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून दिला जाणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतर भत्तेही वाढणार आहेत. यामुळे प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ होणार आहे.