योगींचं नाव घेत धायमोकलून रडू लागली मुस्लीम महिला, म्हणाली "त्यांनी माझ्या आईचं स्वप्न..."

Yogi Adityanath: गँगस्टर अतीक अहमदला (Atiq Ahmed) ठार केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) जप्त करण्यात आलेल्या त्याच्या जमिनीवर गरिबांसाठी घरं उभी केली आहेत. या घरांच्या चव्या प्रयागराजमधील (Prayagraj) गरीब कुटुंबांना देण्यात आल्या. यानंतर काही लाभार्थींना अश्रू अनावर झाले होते.   

शिवराज यादव | Updated: Jul 1, 2023, 10:45 AM IST
योगींचं नाव घेत धायमोकलून रडू लागली मुस्लीम महिला, म्हणाली "त्यांनी माझ्या आईचं स्वप्न..." title=

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील लूकरगंजमधील जमीन गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) ताब्यात होती. दरम्यान, त्याच्या मृत्यनंतर योगी सरकारने ही जमीन ताब्यात घेत गरिबांसाठी घऱं उभी केली. ही सर्व घरं आता गरिबांना सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yoja) 76 फ्लॅट्सची चाव्या लाभार्थ्यांकडे सोपवल्या. यावेळी अनेक कुटुंबाना आपल्या डोक्यावर छत आल्याने अश्रू अनावर झाले होते. अनेकांना तर योगी सरकारने आपलं घराचं स्वप्न पूर्ण केल्यावर विश्वासच बसत नव्हता. 

योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमात जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले "राज्यभरातील सर्व विकास प्राधिकरण या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. मी सर्व विकास प्राधिकरणांना आवाहन करतो की, त्यानी माफियांकडून सोडवण्यात आलेल्या जमिनींवर गरिबांसाठी घरं उभी करावीत. जर गरिबांना त्यांचे अधिकार दिले तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल". 

मुस्लीम महिलेला अश्रू अनावर

घऱाचं स्वप्न पूर्ण झालेल्या जाहिदा फातिमा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "आज आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. मी योगींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आईचं स्वप्न होतं. आज माझी आई या जगात नाही. माझ्या कुटुंबात वडिलांशिवाय दोन भाऊ आणि एक बहिण आहे. आपलं घर छोटंसं घर असावं असं आमचं आणि खासकरुन आईचं स्वप्न होतं. आम्ही 30 वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होतो. आम्हाला ठिकठिकाणी धक्के खावे लागत होते. मी योगी आदित्यनाथ य़ांचे जितके आभार मानेन तितके कमी आहेत. मी मनापासून त्यांचे आभार मानते. मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही".

यानंतर फातिमा यांना अश्रू अनावर झाले होते. "मी भावूक होत आहे कारण हे माझ्या आईचं स्वप्न होतं. मला काय मिळालं आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. योगी आदित्यनाथ यांनी बुडणाऱ्याला मदत केली आहे. त्यांचे मनापासून आभार," या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

"स्वप्न पूर्ण झाल्यावर विश्वास बसत नाही"

दरम्यान, दुसऱ्या एका महिला लाभार्थ्याने म्हटलं की, 'मला जितका आनंद झाला आहे, तो मी मांडू शकत नाही. आपलं घराचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. पण आज पूर्ण झालं आहे आणि त्यावर विश्वासच बसत नाही आहे. आज मी माझ्या घराच्या खाली उभी आहे. आता कोणीही आम्हाला वारंवार हे करु नका, ते करु नका सांगणार नाही. योगी सरकारचे आभार'
 
अतीक अहमदच्या तावडीतून सोडवलेल्या या जमिनीवर उत्तर प्रदेश सरकारने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 76 फ्लॅट्स तयार केले आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये सरकारने अतीक अहमदची 15 हजार स्क्वेअर फूट जमीन ताब्यात घेतली होती. यावर 4 मजल्यांची इमारत उभी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 76 फ्लॅट्स आहेत. यामधील प्रत्येक फ्लॅटची किंमत 7.5 लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना फक्त 3.5 लाख रुपये द्यायचे आहेत. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहे.