भारतीय सैन्याने २४ तासांतच घेतला बदला, पाकिस्तानच्या स्नायपरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यामध्ये मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासोबत इतर तीन जवानांनाही वीरमरण आलं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 24, 2017, 08:25 PM IST
भारतीय सैन्याने २४ तासांतच घेतला बदला, पाकिस्तानच्या स्नायपरचा खात्मा title=
File Photo

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यामध्ये मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासोबत इतर तीन जवानांनाही वीरमरण आलं.

पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने अवघ्या २४ तासांतच प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या स्नायपरचा खात्मा केला आहे. 

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला. शनिवारी रात्री केलेल्या या गोळीबारात महाराष्ट्राचे सुपुत्र भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले. त्यासोबतच इतरही तीन जवान शहीद झाले होते.

मेजर प्रफुल्ल मोहरकर, लांस नायक गुरमैल सिंह, अंबादास आणि परगट सिंह हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच इतर दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.