आधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा

प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे  बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 4, 2017, 09:30 AM IST
आधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा title=

नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे  बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.

त्यासाठी प्राप्तीकर विभागाने करदात्यांसाठी आता अर्जही उपलब्ध करून दिले आहेत. सध्या ऑनलाइन आणि एसएमएसशिवाय ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अर्जामध्ये संबंधित करदात्याला पॅन, आधार कार्डचे क्रमांक, दोन्ही कागदपत्रांवरील योग्य स्पेलिंगसह नावे आणि देण्यात आलेला आधार कार्डचा क्रमांक अन्य कोणत्याही पॅन कार्ड समवेत जोडण्यात आलेला नाही, याचे स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र जोडावे लागणार आहे. 

दरम्यान, तुमच्याकडे एकच पॅन आवश्यक आहे. जर तुमच्याकडे दोन पॅन असतील तर त्याची माहिती तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्र जोडावे लागणार आहे. 

देशात ११५ कोटी आधार कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचवेळी पॅनकार्ड बाळगणाऱ्यांची संख्या २५ कोटींपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत २.६२ कोटी जणांनी आधार आणि पॅनची जोडणी केली आहे.

 ‘यूआयडीपीएएन’ फॉरमॅटमध्ये आधार आणि पॅनचे क्रमांक लिहून तो मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवूनही आधार आणि पॅन जोडता येणे शक्य आहे. मात्र, ज्यांचे नाव पॅन आणि आधार कार्डवर एकसारखे आहे, त्यांच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे.