कामाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी मतं दिली- अरविंद केजरीवाल

 आपचे प्रमुख केजरीवाल यांनी दिल्लीकर मतदारांचे आभार मानले. 

Updated: Feb 11, 2020, 03:48 PM IST
कामाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी मतं दिली- अरविंद केजरीवाल  title=

नवी दिल्ली : २४ तास वीज मिळाली, चांगले शिक्षण, आरोग्य मिळालेल्या प्रत्येक दिल्लीकरांचा हा विजय आहे. दिल्लीकरांनी नव्या राजकारणाला जन्म दिल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. दिल्ली निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झाले असून यात आम आदमी पार्टीला जनतेने एकहाती सत्ता दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आपचे प्रमुख केजरीवाल यांनी दिल्लीकर मतदारांचे आभार मानले. 

कामाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी मतं दिली. जो स्वस्त वीज, घराघरात पाणी, चांगले रस्ते देणाऱ्यालाच मतदान हे दिल्लीकरांनी दाखवून दिले. हे राजकारण देशासाठी लाभदायक आहे. आज मंगळवार हनुमानाचा दिवस असून प्रभुचे देखील त्यांनी आभार मानले. 

आम्ही दिल्लीचे २ कोटी लोक मिळून दिल्लीला सुंदर शहर बनवू असा विश्वास त्यांनी दर्शवला. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. कुटुंबाने देखील सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.