मरणापूर्वी असं काही म्हणाला दहशतवादी अबू दुजान...

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मारला गेलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवागी अबू दुजान याला एन्काऊंटरच्या काही क्षण आधी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केलं होतं.

Updated: Aug 3, 2017, 11:23 PM IST
मरणापूर्वी असं काही म्हणाला दहशतवादी अबू दुजान... title=

श्रीनगर : दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मारला गेलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवागी अबू दुजान याला एन्काऊंटरच्या काही क्षण आधी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केलं होतं. मात्र त्यानं या आवाहनाला अजिबात प्रतिसाद दिला नाही.

अबू दुजान आणि एका लष्करी अधिकाऱ्यामध्ये फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यातून दुजाननं समर्पणास नकार दिल्याचं स्पष्ट झालंय. या अधिकाऱ्यानं दुजानला समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला. आपलं लग्न झालेलं नाही, मी जेव्हा आई-वडिलांना सोडून आलो तेव्हाच ते माझ्यासाठी मेलेत अशा प्रकारची विधानं दुजाननं या संभाषणात केली आहेत.