निर्भया प्रकरण: फाशीनंतर दोषींच्या वकिलाचा मोठा खुलासा

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी झाल्यानंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया

Updated: Mar 20, 2020, 10:44 AM IST
निर्भया प्रकरण: फाशीनंतर दोषींच्या वकिलाचा मोठा खुलासा title=

नवी दिल्ली : निर्भया (Nirbhaya) च्या दोषींना आज फाशी दिल्यानंतर देशभरात सगळ्यांनीच समाधान व्यक्त केलं. ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला. २०१२ ला डिसेंबर महिन्यात निर्भयावर अत्याचार झाले होते. यामुळे अशा प्रकारे वाईट कृत्य करणाऱ्यांमध्ये एक भीती निर्माण होईल.

दुसरीकडे निर्भयाच्या दोषींच्या बाजुने लढणारे वकील एपी सिंह यांनी म्हटलं की, 'मला माहित होतं की, निर्णय़ काय येणार आहे. तरी देखील मी ही केस हातात घेतली. खरंतर मला ही केस लढवायची नव्हती. पण पवनच्या आईने आणि पत्नीने मला विनंती केल्यामुळे मी ही केस लढली.'

एपी सिंह यांनी पुढे म्हटलं की, 'मी ही केस हातात घेतल्यानंतर मला अनेक धमक्या आल्या. सोशल मीडियावर लोकांनी शिव्या दिल्या. पण त्यांनी म्हटलं की, निर्भयाच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेतला गेला. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जागोजागी प्रोटेस्ट करुन घेतल्याचा आरोपा लावला.

निर्भयाच्या दोषींना आज पहाटे फासावर लटकवण्यात आलं. आज तिहाड जेलच्या बाहेर एक वेगळंच दृष्य पाहायला मिळालं. या दरम्यान जेलच्या बाहेर लोकांना निर्भया जिंदाबादच्या घोषणा दिल्या. दोषींच्या बाजुने लढणाऱ्या वकिलांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर लोकांनी समाधान व्यक्त केलं.