कहर! भांडणाचा फायदा घेत वाटसरुंकडून आंब्यांची लूट

त्यांनी हजारो रुपयांचा आंबा पळवला; व्हिडिओ व्हायरल

Updated: May 22, 2020, 05:23 PM IST
कहर! भांडणाचा फायदा घेत वाटसरुंकडून आंब्यांची लूट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : सहसा संकटाच्या प्रसंगी एकमेका सहाय्य करु, अशीच काहीशी अनेकांची भूमिका असते. पण, काही प्रसंग मात्र याला अपवाद ठरतात आणि मानवी वृत्ती इतकी संकुचित कशी असु शकते हाच प्रश्न मनात घर करुन जातो. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. अर्थात व्हिडिओतील दृश्य पाहता हा कहर मन विचलित करणाराही ठरत आहे. दिल्लीचीत ही घटना पाहताना एका फळ विक्रेत्याचं दुर्लक्ष असल्याचं हेरत रस्त्यावरुन येणारे- जाणारे, रिक्षा चालक या साऱ्यांनी फळ विक्रेत्याच्या स्टॉलवरून आंबे आणि इतरही काही गोष्टी पळवल्या. 

'एनडीटीव्ही'ने प्रसिद्ध केलेल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून दिल्लीच लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतरही अनेक अंशी कोरोनाबाबतची सावधगिरी बाळगण्यात येत आहे. असं असतानाच तेथे उसळलेल्या एका भांडणाचा फायदा घेत इथे आंबे पसार केले गेले. जवळपास ३० हजारांचे आंबे या महानुभावांनी लंपास केले.

कंधों से मिलते है कंधे! पोलिसांसाठी लष्कराच्या जवानांनी पाठवली खास भेट

 

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार फळ विक्रेत्याला त्याचा स्टॉल हटवण्यास सांगण्यात आलं होतं. या साऱ्या बाचाबाचीमध्ये त्याच्या फळांचे क्रेट हे मोकळे असून, त्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे अनेकांच्या नजरेत आलं. ज्यानंतर काहींनी थेट दिवसाढवळ्याच चोरी करण्याचा निर्णय घेतला. बरं इतरांनाही यासाठी बोलवून घेतलं. वाहनांवरुन जाणाऱ्या काहींनी तर, हेल्मेटमध्येही आंबे नेले. आता हा वेडेपणा म्हणावा, सवय म्हणावी की कहर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.