अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024:  अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 9, 2024, 01:09 PM IST
अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा title=
Akshaya Tritiya 2024 try these better investment option for gold

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीया हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी घरातील देवांची पूजा केली जाते. तसंच, या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. यावेळी सराफा दुकानांतही खूप गर्दी असते. अशावेळी तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल तर या पर्यायांचाही वापर करु सकता. तसंही आजच्या काळात सोनं खरेदी केलं तरी ते सुरक्षित ठेवणे हीदेखील मोठी जबाबदारी असते. अशावेळी तुम्ही या पर्यायांचा विचार करु शकता. 

भारतात फार पूर्वीपासून सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते. मात्र हल्लीच्या काळात सोनं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीदेखील जोखमीची असते. अशावेळी सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी दुसरा कोणता पर्याय आहे का, याची चाचपणी केली जाते. जिथे सोनं जितका परतावा देईल तितकाच परताना मिळेल व सुरक्षिततेचीही काळजी नाही. तर, आम्ही आज असेच काही पर्याय तुमच्यासमोर आणले आहेत. 

सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी आज अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही फिजिकल गोल्डसोबतच डिजीटल गोल्डमध्येदेखील गुंतवणूक करु शकता. यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्याव्यतिरिक्त कुठे गुंतवणूक करु शकता याची माहिती घेऊया. 

गोल्ड ईटीएफ 

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF) हे एक प्रमाणे स्टॉक आणि डिजीटल गोल्डसारखाच प्रकार आहे. ज्या प्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये कंपनीचे स्टॉक खरेदी करता त्याचप्रमाणे आपल्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधून गोल्ड ईटीएफदेखील खरेदी करु शकता. गोल्ड ईटीएफ तुम्ही बाजारात जी चालु किंमत आहे त्याप्रमाणेच खरेदी किंवा विक्री करता येते. 

गोल्ड फंड

गोल्ड फंड दोन प्रकारचे असतात. गोल्ड फंडमध्ये तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फंडात गुंतवणुक करु शकता. हे एक म्युचुअल फंड प्रमाणेच आहे. यात तुम्ही कमी किंमतीत सोनं खरेदी करु शकता. हा पर्याय त्या गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर आहे जे फिजिकल पद्धतीने सोनं खरेदी करण्याऐवजी सोन्याच्या वाढत्या किंमतीचा फायदा घेतात.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड

डिजीटल गोल्डला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय बँकेकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) सुरू करण्यात आले आहे. एसबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केले जातात. यात गुंतवणूक केल्यानंतर योग्य तो परतावा तर मिळतोच पण त्याबरोबर जोखिमही कमी असते. सरकारकडूनच जारी करण्यात आल्यामुळं सुरक्षिततेची हमी असते. 

गोल्ड सेव्हिंग स्कीम

तुम्ही गोल्ड सेव्हिंग स्कीममध्येही गुंतवणूक करु शकता. या पद्धतीने सोनं खरेदी करणं खूप सोप्पं आहे. तुम्हाला एका निश्चित्त कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला काही हफ्तात पैसे जमा करावे लागतात. या स्कीममध्ये पैसे जमा केल्यानंतर परतावा म्हणून चालु बाजारपेठेत असलेल्या दराने सोनं खरेदी करु शकता. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि उपलब्ध आकडेवारीच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. हा अंतिम आर्थिक सल्ला नसून कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)