Motivational: चहा विकणाऱ्याला कंपनीत मिळाली अशी पदोन्नती, 'त्या' पोस्टवर आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन

आनंद महिंद्रा याचे प्रेरणादायी ट्वीट्स आणि रिप्लाय सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची एक रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Aug 8, 2022, 08:39 PM IST
Motivational: चहा विकणाऱ्याला कंपनीत मिळाली अशी पदोन्नती, 'त्या' पोस्टवर आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन title=

Anand Mahindra Reply On Social Media: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून ते सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधत असतात. आनंद महिंद्रा याचे प्रेरणादायी ट्वीट्स आणि रिप्लाय सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची एक रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका युजर्सने आनंद महिंद्रा यांच्या ट्वीट्सला रिप्लाय देत आपल्या वडिलांची प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे. यात वडिलांचा चहा विकण्यापासून अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास नमूद करण्यात आला आहे. या रिप्लायवर आनंद महिंद्रा यांनी दिलेली रिॲक्शननं सर्वांचं मन जिंकून घेत आहे. 

सोशल मीडिया युजर्स सुंदर शेट्टी याने लिहिलं आहे की, "1965 मध्ये माझे वडिल मुंबईत कांदिवली येथील महिंद्राच्या फॅक्टरीमध्ये चहा विकायचे. पण कंपनीने त्यांच्यातील स्किल पाहून त्यांना वेल्डिंग सेक्शनमध्ये नोकरी दिली." सुंदर शेट्टीचा पोस्टवरील रिप्लाय नेटकऱ्यांना चांगलाच भावला. या रिप्लायने आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलं. 

सुंदर शेट्टी याच्या पोस्टवर आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय दिला आहे. सर्वप्रथम उशिरा रिप्लाय दिल्याने दिलगिरी व्यक्त करत लिहिलं आहे की, " उशिरा रिप्लाय दिल्याने प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. तुझ्या वडिलांचा प्रवास मला काम करण्यासाठी प्रेरणा देते. जीवन बदलण्यासाठी बिझनेस एक शक्ती आहे." आनंद महिंद्रा यांचं रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच आनंद महिंद्रा यांचं नेटकरी कौतुकही करत आहे.