Lok Sabha Election 2019: आंध्र प्रदेशात गरिबांवर अनुदानांची खैरात; वर्षाला दोन लाखांची आर्थिक मदत

 सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला २ लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे.

Updated: Apr 7, 2019, 10:30 AM IST
Lok Sabha Election 2019: आंध्र प्रदेशात गरिबांवर अनुदानांची खैरात; वर्षाला दोन लाखांची आर्थिक मदत title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला २ लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आम्ही सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतचे फायदे देऊ. एवढा फायदा देण्याचा विचार इतर पक्ष स्वप्नातही करू शकत नाही. पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू ठेवतानाच तेवढीच १५ हजारांची मदत राज्य सरकारकडून देण्याचे आश्वासनही त्यांनी जाहीरनाम्यात दिले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसनेही जाहीरनामा प्रसिद्ध करत तेलुगु देसमने देऊ केलेल्या फायद्याएवढाच फायदा देण्याचे आश्वासन दिले आहे. आंध्र प्रदेशात ११ एप्रिलला विधानसभा आणि लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक होतेय. 

लोकसभेसोबत होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा विचार करायचा झाल्यास ओडिशामध्ये बिजू जनता दल १४७ पैकी १०० जागा जिंकून सत्ता कायम राखेल. तर आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस मोठी राजकीय उलथापालथ करु शकते. याठिकाणी वायएसआर काँग्रेसला १७५ पैकी १०० जागा मिळू शकतात, असा अंदाज निष्कर्ष इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाअंती वर्तवण्यात आला आहे.