गुजरातमध्ये मतदानादरम्यान वादग्रस्त घटना घडल्या

गुजरातमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान काही ठिकाणी वादग्रस्त घटना घडल्यात.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 12:52 PM IST
गुजरातमध्ये मतदानादरम्यान वादग्रस्त घटना घडल्या  title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान काही ठिकाणी वादग्रस्त घटना घडल्यात.

सुरत, पोरबंदर, राजकोट आणि अमरेलीत ईव्हीएमवरून वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मतदारसंघ असलेल्या राजकोट जिल्ह्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमचा बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. तर पोरबंदरमध्येही शहरातल्या काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाच्या घटना घडल्यात. पोरबंदरमध्ये ईव्हीएमसोबत वायफायच्या माध्यमातून छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडीया यांनी केलाय.

तर  सुरतमधल्या वारच्छा मतदारसंघाततल्या मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन आणि एक व्हीव्हीपॅटचा बिघाड झाल्यामुळे ते बदलण्यात आले आहेत. मात्र मशीनसोबत छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेस उमेदवारानं केलाय. तर हा यांत्रिक बिघाड असल्याचा दावा निवडणूक अधिका-यांनी केलाय. या घटना वगळता पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत सुरू आहे.