अयोध्येत ऐतिहासिक दीपोत्सव; रचला विश्वविक्रम

अयोध्येतल्या विक्रमी दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Updated: Oct 27, 2019, 01:28 PM IST
अयोध्येत ऐतिहासिक दीपोत्सव; रचला विश्वविक्रम title=

अयोध्या : प्रकाशाचा उत्सव दीपावली संपूर्ण देशात साजरा केली जात आहे. त्यातच श्रीराम यांचा राज्याभिषेक समारोह याचं औचित्य साधून, अयोध्येमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस रामजन्मभूमी लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे. 

दीवाळीच्या एक दिवस आधी रामनगरी अयोध्यामध्ये भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सहा लाखांहून अधिक लावण्यात आलेल्या दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून गेली आहे. अयोध्येतल्या या विक्रमी दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  

दीपोत्सवाच्या या कार्यक्रमात युपीच्या राज्यपाल आनंदी बेन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह अनेक मंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ विरोधी पक्षावर हल्लाबोल करायला विसरले नाहीत. 

  

यानिमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. भव्य शोभायात्रेने या सोहळ्याला प्रारंभ झाला. अत्यंत भव्यदिव्य असा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हा विक्रमी दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीकही अयोद्धानगरीत दाखल झाले आहेत. यावेळी लेजर शोच्या माध्यमातून राम कथाही सादर करण्यात आली.