VIDEO: टीव्ही शोमध्ये बाबा रामदेव संतापले

योगगुरु बाबा रामदेव एका टीव्ही शो दरम्यान चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं. आज तक वृत्तवाहिनीच्या 'थर्ड डिग्री' या कार्यक्रमात प्रसिद्ध पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यावर बाबा रामदेव भडकले.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 18, 2018, 02:24 PM IST
VIDEO: टीव्ही शोमध्ये बाबा रामदेव संतापले title=

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव एका टीव्ही शो दरम्यान चांगलेच भडकल्याचं पहायला मिळालं. आज तक वृत्तवाहिनीच्या 'थर्ड डिग्री' या कार्यक्रमात प्रसिद्ध पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यावर बाबा रामदेव भडकले.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

आज तक वृत्तवाहिनीच्या 'थर्ड डिग्री' या कार्यक्रमात पुण्यप्रसून वाजपेयी, अंजना ओम कश्यप हे बाबा रामदेव यांची मुलाखत घेत होते. यावेळी बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत होता आणि त्याच दरम्यान बाबा रामदेव संतापले. 

या मुलाखतीत पुण्यप्रसून वाजपेयी यांनी प्रश्न विचारला की, "भारताला सध्या कसली गरज आहे?, असे बाबा जे मोठ-मोठ्या आलिशान गाड्यांतून फिरतात, चार्टर्ड प्लेनमधून फिरतात, वृत्तवाहिन्यांमध्ये अॅड्स चालतात, टॅक्स वाचविण्यासाठी ट्रस्ट बनवलं आहे."

यानंतर बाबा रामदेव चांगलेच संतापले आणि त्यांनी म्हटलं की, "माझ्यावर खूपच गंभीर आणि खोटे आरोप तुम्ही करु शकत नाही. मी मोठ-मोठ्या गाड्यांमध्ये फिरत नाही, टॅक्सची चोरी करत नाही. तुम्ही पत्रकार असून राजकारण्यांप्रमाणे माझ्यावर आरोप करु शकत नाहीत."

तुम्हीच पाहा नेमकं काय घडलं....

...आणि बाबा रामदेव संतापले