भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता

भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 29, 2020, 09:28 PM IST
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता आहे.  नागरी उड्डयण मंत्र्यांनी असे संकेत दिले आहेत. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारचा विचार सुरू आहे. ५ जानेवारीनंतरही काही दिवसांसाठी विमानसेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी सहा जणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील बंदी वाढवली जाण्याची शक्यता आहे. नागरी उडड्यन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत तसे संकेत दिले आहेत. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर पुढील काही काळासाठी बंदी वाढवण्यात येऊ शकते. 

सध्या सरकारने ५ जानेवारीपर्यंत ब्रिटनवरुन येणाऱ्या विमानसेवांवर बंद घातली आहे. मात्र आता पुढे आणखी काही दिवसांसाठी ही विमानसेवा बंद करण्य़ाबाबत विचार सुरू असल्याचं नागरी उड्डयण मंत्र्यांनी सांगितलं आहे.