अपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले

Accident News : कारच्या भीषण अपघातात का व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी गमवाली. पण मदत करण्याऐवजी रस्त्यावरची लोकं अपघाताचे फोटो काढण्यात मग्न होते, अॅम्ब्युलन्स मागवली तर त्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. हे कमी की काय स्मशानभूमीतही त्याला लुटलं गेलं

Updated: Mar 6, 2023, 05:05 PM IST
अपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले  title=
संग्रहित फोटो

Shocking News : मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं ही म्हण आपण आतपर्यंत ऐकत आलो आहोत. पण याचं प्रत्यक्ष उदाहरणही आता पाहिला मिळालंय. एका व्यक्तीची पत्नी आणि मुलगी रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यूमुखी पडल्या. पण त्याचं दु:ख इथेच संपलं नव्हतं. त्याला आलेले अनुभव माणूसकीला लाजवेल असेच होते. जीवलग गमवाल्याच्या दु:खात असलेल्या या व्यक्तीला अॅम्ब्युलन्सवाल्यापासून (Ambulance) स्मशानभूमीतल्या (Cemetery) कामगारांपर्यंत सर्वांनीच लुटलं. 

काय आहे नेमकी घटना?
बंगळुरुमध्ये (Bengaluru) राहणआऱ्या 51 वर्षांच्या सुनील कुमार यांनी एका रस्ते अपघतात आपली 48 वर्षांची पत्नी आणि 15 वर्षांची मुलगी गमावली. आता सुनील कुमार यांच्या कुटुंबात ते आणि 10 महिन्यांची मुलगी असे दोघेच उरले आहेत. या अपघाताने सुनील कुमार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने ते राहात असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होतेय. आधीच जीवलग गमावल्याचं दु:ख त्यातच त्यांना आलेले अनुभव त्याही पेक्षा वाईट होते. 

इथे ओशाळली माणूसकी
सुनील कुमार यांच्या पत्नीचं आणि मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेचनासाठी (Autopsy) रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनाचं सोपस्कर पार पडल्यानंतर दोघींचे मृतदेह अनेकल सरकारी रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी अँम्ब्युलन्स ड्रायव्हर (Ambulance Driver) सुनील कुमार यांच्याकडून तब्बल 21 हजार रुपये घेतले. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले. पण स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल (Autopsy Report) देण्यासाठी सुनील कुमार यांच्याकडून 60 हजार रुपयांची मागणी केली. एका सीनिअर पोलीस अधिकाऱ्याने मध्यस्थी केल्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत. 

मदतीऐवजी लोकं फोटो काढत होते
सुनील कुमार यांच्या मोबाईलवर त्यांच्या कारचे एअरबॅग उघडल्याचा मेसेज आला. तेव्हांच त्यांच्या मनात काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. सुनील कुमार यांची पत्नी आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. पण कग्गलीपूरा-बन्नेरघट्टा रोडवर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. सुनील कुमार यांना मेसेज मिळताच त्यांनी एका मित्राला घेऊन घटनास्थळ गाठलं, त्यांची शंका खरी ठरली होती. कारला भीषण अपघात झाला होता, कारमध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी अडकून पडल्या होत्या.

त्यांनी जीवाच्या आकंताने अपघातग्रस्त कारजवळ धाव घेतली. त्याआधीच तिथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पण त्यातल्या एकानेही कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या मोबाईलमधून फोटो काढण्यात धन्यता मानली होती. सुनील कुमार यांनी ओरडून ओरडून कारमध्ये अडकलेले पत्नी आणि मुलगी असल्याचं सांगत मदत मागितली. पण एकही माणूस त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. कदाचित वेळेवर मदत मिळाली असती तर सुनील कुमार यांची पत्नी आणि मुलगी जिंवत असते. 

यानंतर अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरने त्यांच्याकडे 21 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मृतदेह घेऊन जाणार नसल्याची धमकीही त्याने दिली. तर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 60 हजार रुपयांची मागणी केली. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्तीने कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत. पण रिपोर्ट देण्यासाठी त्यांनी तब्बल 21 दिवस लावले.