तुमचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असेल तर खबरदार

तुमच्याकडे जर तुमचा कोणता महत्त्वाचा (document)दस्तावेज मागितला, तर तुम्ही नक्कीच आधारकार्ड पुढे कराल.

Updated: Feb 16, 2021, 08:34 PM IST
तुमचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद असेल तर खबरदार title=

मुंबई : तुमच्याकडे जर तुमचा कोणता महत्त्वाचा (document)दस्तावेज मागितला, तर तुम्ही नक्कीच आधारकार्ड पुढे कराल. अशाच महत्त्वाच्या असलेल्या document बद्दल तुम्हाला अनेक प्रश्न असतील, अनेकदा तर तुम्हाला आधारकार्डशी लिंक असलेला तुमचा फोन नंबर सुद्धा आठवत नसेल. किंवा मग तो फोन नंबर हरवला, बदलला किंवा बंद असला तर काय करावे ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीचं पडत असणार.

पण आता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, ते पण घरबसल्या. 

सगळ्यात पहिलं UIDAI च्या वेबसाइट वर जा.

येथे तुम्हाला आधार सर्व्हिसेसचा (Aadhar Services) चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
पहिला पर्याय आधार क्रमांक पडताळणीचा असेल, 
त्यावर क्लिक केल्यास एक नवीन विंडो उघडेल त्यात तुमचा आधार क्रमांक टाका. 
त्यानंतर प्रोसीड ट् वेरिफाई वर क्लिक करा.
आता तुम्हाला आधारची स्थिती दिसेल.
त्यामध्ये आधार क्रमांक, वय, राज्य आणि मोबाइलनंबर यासारखे बरेच तपशील वेरीफाय (verify) होतील.
एखादा मोबाइलनंबर आपल्या आधारशी कनेक्ट (CONNECT)केलेला असेल तर त्या नंबरचे शेवटचे 3 अंक येथे दिसतील.
या प्रकारे आपण आपल्या आधारशी कोणता मोबाइल नंबर लिंक आहे ते शोधू शकता.
जर कोणताही नंबर आपल्या आधारशी लिंक केलेला असेल तर तेथे काहीही लिहिले जाणार नाही.
याचा अर्थ असा की कोणताही नंबर आपल्या आधारशी संबंधित नाही.

Telecom Regulatory Authority of India (TRAI)सूचनांनुसार, एखादा व्यक्ती जर मोबाईल 90 दिवसांपर्यंत 

रीचार्ज करत नाही. मग मोबाईल कंपनीला हा नंबर दुसर्‍या ग्राहकाला देण्याचा अधिकार आहे. 

जर आपल्याकडे असा मोबाइल नंबर देखील आहे, ज्याचा आपण बर्‍याच काळासाठी रिचार्ज केला नाही, तर आपण त्वरित रिचार्ज करा, अन्यथा हा नंबर दुसर्‍या ग्राहकाला दिला जाऊ शकतो. आणि तुमचा तो नंबर जर आधारशी लिंक असेल तर काळजी घ्या सावध रहा.