परदेशातून तुमचा डेटा होतोय चोरी? पण कसा? 'हे' उपाय करा म्हणजे पुन्हा डाटा हॅक होणार नाही!

 identity theft म्हणजे एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरून त्यांना फसवणे.

Updated: Jul 23, 2022, 04:36 PM IST
परदेशातून तुमचा डेटा होतोय चोरी? पण कसा? 'हे' उपाय करा म्हणजे पुन्हा डाटा हॅक होणार नाही! title=

identity theft: जगातील वाढत्या तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोपे झाले आहे पण त्यामुळे आपल्यासाठी अनेक धोके निर्माण झाले आहेत. इंटरनेटवर हजर असलेल्या हॅकर्समुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ऑनलाइन जगात identity theft ही एक लोकप्रिय संज्ञा आहे परंतु या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? identity theft म्हणजे एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरून त्यांना फसवणे.

आजकाल सगळं जग एका क्लिकवर आल्याने याचे धोकेही वाढू लागले आहेत. तेव्हा नक्की ही चोरी कशी होते? आणि ती रोखण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती असणं बंधनकारक आहे. 

'याच्या' मदतीने डेटा होतोय चोरी...
अनेका कुठल्याही ऑनलाईन साईटवर आपण गेलात तर तिथून अनेक ऑफर्स येत राहतात आणि हेच हॅकर्सच्या दृष्टीने सोयीस्कर असते. इथून हॅकर्स आपला डेटा जास्त प्रमाणात चोरी करतात. हे हॅकर्स आपल्याला आकर्षक ऑफर्स दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. लोकं त्यावर क्लिक करतात आणि या हॅकर्सना बळी पडतात. हॅकर्स हे बँकिंग, गुंतवणूक आणि ईमेल यांच्या साहाय्याने ऑनलाईन युझर्सना अडकवतात. 

तूम्ही ऑनलाईन फाईल्स, पीडीएफ डाऊनलोड करत आहात तर जरा जपून...
ऑनलाईन साईट्सवरून जर का तूम्ही पीडीएफ आणि इतर फाईल्स डाऊनलोड करत असाल तर ते वेळीच थांबवा कारण असे करणे हे अत्यंत धोकादायक आहे. कुठेही इतर ई-मेल्स किंवा पॉप-अपवरही क्लिक करू नका. तूम्ही कुठल्या वेबसाईटवरून माहिती घेत असाल आणि ती साईट सारखी हॅक होत असेल तर वेळीच त्या साईटवर जाणे थांबवा. 

स्पायवेअरने हॅकिंग...
जर तूम्ही कुठल्याही अनऑफिशियल साईटवर आला असला तर त्यातून तूम्ही नकळतच व्हायरस असणाऱ्या पीसीमध्ये प्रवेश करता. तो पीसी तूम्ही काय ब्राउझिंग करताय यावर लक्ष ठेवतो. त्यातून ते तूमची वैयक्तिक माहिती गोळा करते. ज्यातून तूमच्या क्रेडिट कार्डपर्यंत तूमची फसवणूक होऊ शकते. 

तूमच्या या डेटाला आहे सर्वात जास्त धोका...

हे हॅकर्स तूमची महत्त्वपुर्ण माहिती चोरतात ज्यात तूमच्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टींचा समावेश असतो. credit card क्रमांक, bank account क्रमांक, social security, users name, address, email इत्यादी माहिती लंपास केली जाते. 

कसे वाचाल या हॅकर्सपासून...
identity theft पासून वाचायचे असल्यास खालील उपाय करणं बंधनकारक आहे. 
- ऑनलाईनवरही डेटा प्रोटेक्शनचे पर्याय असतात त्याबद्दल योग्य ती माहिती घ्या आणि त्यावरील सगळ्या नियमांचे पालन करा. 
- अनऑफिशियल संकेतस्थळांपासून दूर राहा. 
- जर काही ई-मेल्स तूम्हाला संशयास्पद वाटत असतील तर वेळीच त्यांना स्पॅममध्ये टाका. 
- योग्य संकेतस्थळावरूनच माहिती डाऊनलोड करा. 
- सायबर कॅफेजमध्ये जात असाल तर योग्य ती सावधता बाळगा. 
- तूमच्या पीसीमध्ये अँटीव्हायरस प्रोटेक्शन अॅप्स किंवा वायरवॉल डाऊनलोड करून ठेवा.