धक्का! NDA सरकारमधून आणखी एका पक्षाचा काढता पाय

...म्हणून एनडीएची साथ सोडण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही

Updated: Oct 25, 2020, 07:44 AM IST
धक्का! NDA सरकारमधून आणखी एका पक्षाचा काढता पाय  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : शिवसेना, शिरोमणी अकाली दल अशा पक्षांनी साथ सोडल्यानंतर आता आणखी एका पक्षानं भाजप नेतृत्त्वाखालील सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळत आहे. केरळमधील केरळ काँग्रेस पी.सी. थॉमस गटानं एनडीएला रामराम ठोकल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. 

दिलेल्या आश्वासनानुसार आपल्या पक्षावला कोणतीही जागा देण्यात आली नसल्यामुळं एनडीएची साथ सोडण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही, असं म्हणत रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची माहिती केरळ काँग्रेस नेते पी.सी. थॉमस यांनी दिली. केरळ काँग्रेस नेते चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आपलं स्वागत केल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात आता हे एक नवं वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रानं आणलेल्या नव्या कृषी कायद्यामुळं नाराज शिरोमणी अकाली दलानंही एनडीएतून वेगळं होत सत्ताधाी पक्षाला धक्का दिला होता. याच पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तिथं शिवसेनेनंही भाजपसोबतचं नातं तोडलं. प. बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चानंही एनडीएपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. त्यामुळं केंद्रात आणि देशाच्या राजकीय पटलावर आता पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.