'एक चूक आणि गेम खलास'... स्टंट करताना या बाईकची काय अवस्था झाली, पाहा व्हिडीओ

क धोकादायक बाईक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Oct 13, 2021, 08:29 PM IST
'एक चूक आणि गेम खलास'... स्टंट करताना या बाईकची काय अवस्था झाली, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला एकापेक्षा एक स्टंटचे व्हिडीओ पाहिले असतील. आजकाल तरुणांमध्ये बाईक स्टंट करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. बऱ्याच वेळा काही लोक असे स्टंट करतात, ज्यामुळे आपल्या अंगावर काटा उभा राहिस, तर काही स्टंटच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेल की, त्यांचे स्टंट बऱ्याचदा फसताता आणि जे काहीवेळा मनोरंजक असतात, जे पाहून आपल्या आपले हसू देखील आवरत नाही.

अनेकदा लोकं असे स्टंट दाखवून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतात. असे केल्यानं त्यांना जास्त लाईक्स आणि व्ह्यूव मिळतात आणि याच्यासाठीच त्यांचा हा सगळा खटाटोप सुरू असतो. परंतु कधीकधी हे स्टंट धोकादायकही ठरतात. ज्यामुळे ते आपला जीव गमावतात, तर काही लोकांना आयुष्यभर याची शिक्षा मिळते.

सध्या असाच एक धोकादायक बाईक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्यावर कारसोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसऱ्याच क्षणी काहीतरी असे घडते, जे कदाचित दुचाकीस्वारांने विचार देखील केला नसावा. दुचाकीस्वार स्टंट करताना त्याचा तोल बिघडतो आणि तो खाली पडतो.

व्हिडीओ पाहून आणि बाईकची स्थिती पाहून हे किती गंभीर आहे आणि बाईक चालवणाऱ्याला किती दुखापत झाली असेल याची तुम्हाला कल्पना तर आलीच असेल.

रेस करताना बाईक चालक बाकीसोबत स्टंट करतो, परंतु त्याचा संतुलन बिघडतो, त्यानंतर दुचाकीस्वार काही अंतर बाईक मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. त्याची भरधाव दुचाकी फ्रंट व्हिली मारत असताना रस्त्यावर पडते आणि तिचे तुकडे तुकडे होतात. परंतु नशीबाने या बाईक स्वाराने बाईक हातातून सोडली नाहीतर त्याच्यासोबत काय झालं असतं याचा तुम्ही बाईकची अवस्थापाहून विचार करु शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक लोकांना धक्काच बसला आहे.

हा व्हिडीओ INFINALLEVEL नावाच्या ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 71 हजारपेक्षा वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, शेकडो युजर्स यावर आपलं मत व्यक्त करत आहेत. एका युजर्सने कमेंट करताना लिहिले, मी वयाच्या 15 व्या वर्षापासून दुचाकी चालवत आहे, परंतु अद्याप असे मूर्खपणाचे कृत्य मी कधी केलं नाही.

त्याचवेळी, दुसऱ्या युजर्सने मोठ्या आश्चर्याने विचारले आहे की, बाईकचा ताबा गेल्यानंतरही बाईकर कसा काय धावू लागला? त्याचबरोबर अनेक युजर्स व्हिडीओचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. तर काही युजर्सने या अपघातासाठी स्वत: बाईकरला जबाबदार धरले आहे. तर मोठ-मोठे अपघात हे बाईक स्वारामुळेच बऱ्याचदा घडतात असे देखील काही युजर्सचे म्हणणे आहे.