त्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत - अमित शहा

त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झाले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2018, 10:10 PM IST
त्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत - अमित शहा title=

अगारताळा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अगारताळा येथे एका सभेत घोषणा केली, त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झाले आहे.

२५ वर्षांपासून राज्यात हीच परिस्थिती-शहा

त्रिपुरात आरोग्याच्या सुविधांचीही कमी आहे, मागील २५ वर्षांपासून राज्यात हीच परिस्थिती कायम आहे. त्रिपुरातील ३७ लाख लोकसंख्येपैकी ७ लाखांपेक्षा जास्त लोकांची बेरोजगार म्हणून नोंद झाली आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

हिंसाचाराच्या चिखलापेक्षा कमळ चांगले - शहा

तुमच्या या हिंसाचाराच्या चिखलापेक्षा येथे कमळ उगवलेले कधीही चांगले, अशा शब्दांत यावेळी शहा यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भाजप या हिंसाचाराला घाबरणार नाही-शहा

तुम्ही हिंसाचाराचा कितीही चिखल तयार केला तरी, भाजप या हिंसाचाराला घाबरणार नाही, असे मी त्रिपुरातील माणिक सरकारला मी सांगू इच्छितो, असं शहा म्हणाले.