एकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा

सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2018, 02:37 PM IST
एकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा title=

नवी दिल्ली : सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.

गोरखपूरमध्ये मोठं यश

गोरखपूरमधून खासदार योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांची जागा खाली झाली आहे. 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी 5,39,127 मतं मिळवली होती. तर सपाच्या उमेदवाराला 2,26,344 आणि बसपाच्या उमेदवाराला 1,76,412 मतं मिळाली होती. यामुळे या दोन्ही उमेदवारांची मतं एकत्र केली तरी देखील योगींना मिळालेल्या मतांच्या जवळपास देखील दोन्ही पक्ष पोहोचत नाहीत.

फुलपूरमध्ये अशीच स्थिती

2014 मध्ये फुलपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य मैदानात होते. त्यांना 5,03,564 मतं मिळाली होती. एसपी आणि बसपाच्या उमेदवारांच्या मतांचा बेरीज केली तर ती 3,58,970 इतकी होते. त्यामुळे येथे देखील भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली होती. त्यामुळे बसपा आणि सपा दोन्ही पक्ष एकत्र जरी आले असले तरी त्यांना ही निवडणूक इतकी सोपी जाणार नाही.