इथे गुंतवल्यास ३ दिवसात डबल होईल रक्कम

आयपीओमध्ये कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळतात हा फायदा असतो. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 18, 2017, 02:23 PM IST
 इथे गुंतवल्यास ३ दिवसात डबल होईल रक्कम  title=

नवी दिल्ली : आपल्या इन्व्हेस्टमेंटधून डबल रिटर्न्स मिळावेत आणि त्यात कोणतीही जोखीम नसावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. 

बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरंसी नाही 

त्यामूळे कमी काळात जास्त रक्कम मिळावी असा प्लान सर्वजण शोधत असतात. आपण बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरंसी बद्दल बोलतोय असे तुम्हाला वाटत असेल. पण तसे नाहीए. बिटकॉईनला आरबीआय किंवा कोणत्याच रेग्युलेटरीची मान्यता नाहीए. गेले काही दिवस यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भडकवलही जात होत. 

अशीही गुंतवणूक

इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही पीपीएफ अकाऊंटही ओपन केले असेल. काही लोक सेव्हींग अकाऊंटमध्ये पैसे जमा करतात तर काही एफ.डी देखील करीत असतात.

फायनांशिअल मार्केटमध्ये अशाही जागा आहेत जिथे नियमांचे पालन करुन १०० टक्के रिटर्न मिळू शकतात. 

आयपीओत चांगले रिटर्न्स

आयपीओमधील इन्व्हेस्टमेंट संदर्भात आपण बोलत आहोत.फंड गोळा करण्यासाठी कंपन्या वेळोवेळी आयपीओ घेऊन येत असतात. पण इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आयपीओसंबंधी चांगली माहिती मिळवणे गरजेचे असते. आयपीओमध्ये कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळतात हा फायदा असतो. 

आठवड्यात लिस्टिंग

आयपीओमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर २-३ दिवसात कधीही एक आठवड्यात लिस्टिंग होते. यात तूम्ही शॉर्ट टर्म फायदाच घेऊ शकता. जर तुम्ही १ लाख गुंतवलात तर काही दिवसात याची किंमत २ लाख ही होऊ शकते.

नुकताच एका खासगी बॅंकेने आपला आयपीओ लॉन्च केला होता. एका हफ्त्याने याची लिस्टिंग झाल्यावर गुंतवणूक दारांना ६० टक्के रिटर्न्स मिळाले होते. असा फायदा तुम्हीही घेऊ शकता. 

अशी करा गुंतवणूक 

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमेट अकाऊंट असणे गरजेचे असते. म्हणजे यामध्ये ब्रोकरच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊस वेबसाईटवर वेगळ सेक्शन ठेवते. 

किती स्टॉकसाठी किती किंमत अप्लाय करायची हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या अर्जानुसार तेवढी किंमत आयपीओ बंद होण्याआधी लिस्टिंगमध्ये ब्लॉक केली जाते. 

या गोष्टींची काळजी घ्या 
कोणत्याही आयपीओमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी कंपनीबाबत माहिती करुन घ्यायला हवी. कित्येक रेटींग एजन्सी त्या आयपीओला रेटींगदेखील देत असतात. यावर लक्ष ठेवा.

जर दोन किंवा दोन हून अधिक एजन्सी या आयपीओवर पॉझिटीव्ह असतील तर तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुम्हाला ब्रोकरचा रिपोर्टदेखील पाहायला हवा. 

एवढ्या रक्कमेने करा सुरुवात 

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी  रक्कम गुंतविण्यावर लिमिट नसते. एक निश्चित रक्कम ठेवणे यासाठी गरजेचे असते. आयपीओमध्ये एक शेअरसाठी तुम्ही बीड लावू शकत नाही.

लॉट साइजच्या हिशोबाने इथे अर्ज मागवले जातात.बाजारात जेवढे आयपीओ येत आहेत, त्यातील एका अॅप्लीकेशनमध्ये १२ ते १५ हजार रुपयांची गुंतवणूक गरजेची आहे. 

२५९ रुपयांची लिस्टिंग 

सालासर टेक्नो इंजिनिअरिंग आयपीओची इशू प्राइज १०८ रुपये होती. याची लिस्टिंग २५९ रुपयांना झाली. म्हणजेच गुंतवणूकदारांना थेट १४० रुपयांचा फायदा झाला.

याचा अर्थ, ज्या गुंतवणूकदारांना १ लाख रुपये गुंतवले असतील. त्यांची एकूण रक्कम काही तासातच २.४० लाख झाली आहे. 

शेअर ११५ टक्क्यांनी वाढला

याचप्रमाणे मार्चमध्ये डी-मार्टचा आयपीओदेखील आला होता. शेअरसाठी ऑफर प्राइज २९५ ते २९९ रुपयांपर्यंत ठेवली होती. लिस्टिंग देणारा शेअर ११५ टक्क्यांनी वाढून ६४२ रुपये झाला. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना डबलहून अधिक फायदा झाला.